Bible Language
Marathi Old BSI Version

:

MRV
1. एक दिवस, इस्राएलमधील काही वडीलधारी नेते परमेश्वराचा सल्ला विचाण्यासाठी माझ्याकडे आले. परागंदा अवस्थेतील काळाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या (आँगस्ट) दहाव्या दिवशी ते लोक आले आणि माझ्यापुढे बसले.
1. And it came to pass H1961 in the seventh H7637 year H8141 , in the fifth H2549 month , the tenth H6218 day of the month H2320 , that certain H376 of the elders H4480 H2205 of Israel H3478 came H935 to inquire H1875 H853 of the LORD H3068 , and sat H3427 before H6440 me.
2. मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
2. Then came H1961 the word H1697 of the LORD H3068 unto H413 me, saying H559 ,
3. “मानवपुत्रा, इस्राएलच्या वडीलधाऱ्यांशी (नेत्यांशी) बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही माझा सल्ला घेण्यासाठी आला आहात का? जर तसे असेल. तर मी तुम्हाला सल्ला देणार नाही. परमेश्वर माझा प्रभू, असे म्हणाला,
3. Son H1121 of man H120 , speak H1696 H853 unto the elders H2205 of Israel H3478 , and say H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Are ye H859 come H935 to inquire H1875 of me? As I H589 live H2416 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 , I will not H518 be inquired H1875 of by you.
4. मानवपुत्रा, तू त्यांची परीक्षा करशील का? तू त्यांची पारख करशील का? त्यांच्या वडिलांनी केलेल्या भयंकर गोष्टींबद्दल तू त्यांना सांगितले पाहिजेस.
4. Wilt thou judge H8199 them, son H1121 of man H120 , wilt thou judge H8199 them ? cause them to know H3045 H853 the abominations H8441 of their fathers H1 :
5. ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्यांना सागितले पाहिजेस; ज्या दिवशी मी इस्राएलची निवड केली, याकोबाच्या वंशाला अभिवचन दिले आणि अभय देऊन मी त्यांना माझी ओळख दिली. ‘मीच तुमचा परमेश्वर आहे. असे वचन मी त्यांना निसरमध्ये दिले,
5. And say H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; In the day H3117 when I chose H977 Israel H3478 , and lifted up H5375 mine hand H3027 unto the seed H2233 of the house H1004 of Jacob H3290 , and made myself known H3045 unto them in the land H776 of Egypt H4714 , when I lifted up H5375 mine hand H3027 unto them, saying H559 , I H589 am the LORD H3068 your God H430 ;
6. त्याच दिवशी, त्यांना मिसरमधून बाहेर काढून, मी त्यांना देत असलेल्या भूमीकडे घेऊन जाण्याचेही कबूल केले. ती भूमी अनेक चांगल्या गोष्टीनी भरलेली होती.सर्व देशांपेक्षा हा देश सुंदर होता.
6. In the day H3117 that I lifted up H5375 mine hand H3027 unto them , to bring them forth H3318 of the land H4480 H776 of Egypt H4714 into H413 a land H776 that H834 I had espied H8446 for them, flowing H2100 with milk H2461 and honey H1706 , which H1931 is the glory H6643 of all H3605 lands H776 :
7. “इस्राएलच्या लोकांना त्यांच्या भयंकर मूर्ती दूर फेकून देण्यास मी सांगितले. मिसरच्या त्या अमंगळ पुतळ्यांबरोबर तुम्ही स्वत:ही अमंगळ होऊ नका, असेही मी त्यांना सांगितले. मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
7. Then said H559 I unto H413 them , Cast ye away H7993 every man H376 the abominations H8251 of his eyes H5869 , and defile not yourselves H2930 H408 with the idols H1544 of Egypt H4714 : I H589 am the LORD H3068 your God H430 .
8. पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली माझे ऐकण्याचे नाकारले, त्यांनी त्यांच्या त्या भयंकर मूर्ती ऐकल्या नाहीत ते मिसरचे घाणेरडे पुतळे त्यांनी मिसरमध्येच टाकून दिले नाहीत. मग माझ्या रागाचा पारा किती चढतो हे त्यांना कळावे म्हणून मी (देवाने) मिसरमध्येच त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला.
8. But they rebelled H4784 against me , and would H14 not H3808 hearken H8085 unto H413 me : they did not H3808 every man H376 cast away H7993 H853 the abominations H8251 of their eyes H5869 , neither H3808 did they forsake H5800 the idols H1544 of Egypt H4714 : then I said H559 , I will pour out H8210 my fury H2534 upon H5921 them , to accomplish H3615 my anger H639 against them in the midst H8432 of the land H776 of Egypt H4714 .
9. पण मी त्यांचा नाश केला नाही. माझे लोक जेथे राहात होते तेथे, त्यांना, मिसरमधून बाहेर काढण्याचे मी अगोदरच कबूल केले होते. तेव्हा त्या सर्वांच्या देखत इस्राएलचा नाश मी केला नाही कारण, मला माझ्या नावाला बट्टा लावायचा नव्हता.
9. But I wrought H6213 for my name's sake H4616 H8034 , that it should not H1115 be polluted H2490 before H5869 the heathen H1471 , among H8432 whom H834 they H1992 were , in whose H834 sight H5869 I made myself known H3045 unto H413 them , in bringing them forth H3318 out of the land H4480 H776 of Egypt H4714 .
10. मी इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणले. त्यांना वाळवंटात नेले.
10. Wherefore I caused them to go H3318 out of the land H4480 H776 of Egypt H4714 , and brought H935 them into H413 the wilderness H4057 .
11. मग मी त्यांना माझे कायदे शिकविले, माझे नियम घालून दिले. एखाद्याने ते नियम पाळल्यास, तो जगेल.
11. And I gave H5414 them H853 my statutes H2708 , and showed H3045 them my judgments H4941 , which H834 if a man H120 do H6213 H853 , he shall even live H2421 in them.
12. मी त्यांना विश्रांतीच्या खास दिवसाबद्दलही सांगितले. त्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्या माझ्यामधील विशेष संकेत होते, खूण होती. मीच परमेश्वर आहे ह्या माणसाना, मी, माझी विशेष (पवित्र) माणसे करीत आहे हेच त्या खुणेवरुन दिसे.
12. Moreover also H1571 I gave H5414 them H853 my sabbaths H7676 , to be H1961 a sign H226 between H996 me and them , that they might know H3045 that H3588 I H589 am the LORD H3068 that sanctify H6942 them.
13. “पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला.
13. But the house H1004 of Israel H3478 rebelled H4784 against me in the wilderness H4057 : they walked H1980 not H3808 in my statutes H2708 , and they despised H3988 my judgments H4941 , which H834 if a man H120 do H6213 H853 , he shall even live H2421 in them ; and my sabbaths H7676 they greatly H3966 polluted H2490 : then I said H559 , I would pour out H8210 my fury H2534 upon H5921 them in the wilderness H4057 , to consume H3615 them.
14. पण मी त्यांचा नाश केला नाही. मी इस्राएलला मिसर मधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्यांच्यासमोर इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला काळिमा फासायचा नव्हता.
14. But I wrought H6213 for my name's sake H4616 H8034 , that it should not H1115 be polluted H2490 before H5869 the heathen H1471 , in whose H834 sight H5869 I brought them out H3318 .
15. वाळवंटात त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले. ते असे जी भूमी मी त्यांना देत होतो, तेथे मी त्यांना नेणार नाही. ती समृध्द भूमी होती. तो प्रदेश सर्व देशांपेक्षा सुंदर होता.
15. Yet also H1571 I H589 lifted up H5375 my hand H3027 unto them in the wilderness H4057 , that I would not H1115 bring H935 them into H413 the land H776 which H834 I had given H5414 them , flowing H2100 with milk H2461 and honey H1706 , which H1931 is the glory H6643 of all H3605 lands H776 ;
16. “इस्राएलच्या लोकांनी माझे नियम पाळण्यास नकार दिला. ते माझ्या नियमनुसार वागले नाहीत. त्यांनी माझ्या सुट्ट्यांच्या दिवसाला महत्व दिले नाही. त्यांची मने त्या गलिच्छ मूर्तीमध्ये गुंतली असल्याने ते असे वागले.
16. Because H3282 they despised H3988 my judgments H4941 , and walked H1980 not H3808 in my statutes H2708 , but polluted H2490 my sabbaths H7676 : for H3588 their heart H3820 went H1980 after H310 their idols H1544 .
17. पण मला त्यांची दया आल्याने मी त्यांचा वाळवंटात संपूर्ण नाश केला नाही.
17. Nevertheless mine eye H5869 spared H2347 H5921 them from destroying H4480 H7843 them, neither H3808 did I make H6213 an end H3617 of them in the wilderness H4057 .
18. मी त्यांच्या मुलांशी वाळवंटात बोललो. मी त्यांना सांगितले, “तुमच्या आई-वडिलासारखे होऊ नका. त्यांच्या गलिच्छ मूर्तीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. नियम पाळू नका. त्यांच्या आज्ञा पाळू नका. त्यांच्या त्या गलिच्छ गोष्टीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका.
18. But I said H559 unto H413 their children H1121 in the wilderness H4057 , Walk H1980 ye not H408 in the statutes H2706 of your fathers H1 , neither H408 observe H8104 their judgments H4941 , nor H408 defile yourselves H2930 with their idols H1544 :
19. मी परमेश्वर आहे, मीच तुमचा देव आहे. माझे नियम पाळा. माझ्या आज्ञांचे पालन करा. मी सांगतो तसे वागा.
19. I H589 am the LORD H3068 your God H430 ; walk H1980 in my statutes H2708 , and keep H8104 my judgments H4941 , and do H6213 them;
20. माझ्या सुट्ट्यांच्या दिवसांचे महत्व तुम्हाला वाटते हे दाखवा ते दिवस हे तुमच्या माझ्यामधील विशेष खूण आहे, ह्याची आठवण ठेवा. मी परमेश्वर आहे आणि ते सुट्ट्यांचे दिवस ‘मी तुमचा देव आहे’ हेच दाखवितात.
20. And hallow H6942 my sabbaths H7676 ; and they shall be H1961 a sign H226 between H996 me and you , that ye may know H3045 that H3588 I H589 am the LORD H3068 your God H430 .
21. “पण ती मुले माझ्याविरुध्द गेली. त्यांनी माझे नियम मानले नाहीत. माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. खरे म्हणजे, माझे नियम चांगले आहेत. माणसाने ते पाळल्यास, तो अवश्य जगेल. त्यांनी माझ्या सुट्टयांच्या विशेष दिवसांकडे दुर्लक्ष केले. मग माझा राग किती आहे, हे त्यांना कळावे म्हणून मी वाळवंटात त्यांचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले.
21. Notwithstanding the children H1121 rebelled H4784 against me : they walked H1980 not H3808 in my statutes H2708 , neither H3808 kept H8104 my judgments H4941 to do H6213 them, which H834 if a man H120 do H6213 H853 , he shall even live H2421 in them ; they polluted H2490 H853 my sabbaths H7676 : then I said H559 , I would pour out H8210 my fury H2534 upon H5921 them , to accomplish H3615 my anger H639 against them in the wilderness H4057 .
22. पण मी मलाच आवरले. मी इस्राएलला मिसरमधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्या सर्वांसमक्ष इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला कलंक लावायचा नव्हता.
22. Nevertheless I withdrew H7725 H853 mine hand H3027 , and wrought H6213 for my name's sake H4616 H8034 , that it should not H1115 be polluted H2490 in the sight H5869 of the heathen H1471 , in whose H834 sight H5869 I brought them forth H3318 H853 .
23. म्हणून त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले की मी त्यांना इतर राष्ट्रांत पसरवीन, पुष्कळ वेगवेगळ्या देशांत पाठवीन.
23. I H589 lifted up H5375 H853 mine hand H3027 unto them also H1571 in the wilderness H4057 , that I would scatter H6327 them among the heathen H1471 , and disperse H2219 them through the countries H776 ;
24. “इस्राएल लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी माझ्या नियमाप्रमाणे वागायचे नाकारले. माझ्या सुटृ्यांच्या विशेष दिवसांना त्यांनी महत्व दिले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अमंगळ मूर्तीचीच पूजा केली.
24. Because H3282 they had not H3808 executed H6213 my judgments H4941 , but had despised H3988 my statutes H2708 , and had polluted H2490 my sabbaths H7676 , and their eyes H5869 were H1961 after H310 their fathers H1 ' idols H1544 .
25. म्हणून मी त्यांना वाईट नियम शिकविले त्यांना शुद्धीवर आणणाऱ्या आज्ञा मी त्यांना दिल्या.
25. Wherefore I H589 gave H5414 them also H1571 statutes H2706 that were not H3808 good H2896 , and judgments H4941 whereby they should not H3808 live H2421 ;
26. त्यांच्या दानांबरोबर मी त्यांना अमंगळ होऊ दिले. त्यांनी स्वत:च्याच पहिल्यां अपत्यांचेसुध्दा बळी देण्यास सुरवात केली. अशा रीतीने, मी त्यांचा नाश केल्यावर त्यांना मीच परमेश्वर आहे. हे समजेल!’
26. And I polluted H2930 them in their own gifts H4979 , in that they caused to pass through H5674 the fire all H3605 that openeth H6363 the womb H7356 , that H4616 I might make them desolate H8074 , to the end H4616 that H834 they might know H3045 that H834 I H589 am the LORD H3068 .
27. तेव्हा मानवपुत्रा, आता इस्राएलाच्या लोकांशी बोल ‘परमेश्वर, माझा देव पुढील गोष्टी सांगतो, असे साग: इस्राएलच्या लोकांनी माझी निंदा केली आणि माझ्याविरुद्ध कट रचले.
27. Therefore H3651 , son H1121 of man H120 , speak H1696 unto H413 the house H1004 of Israel H3478 , and say H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Yet H5750 in this H2063 your fathers H1 have blasphemed H1442 me , in that they have committed H4603 a trespass H4604 against me.
28. पण तरीसुद्धा, त्यांना कबूल केलेल्या प्रदेशात मी त्यांना आणले. त्यांनी टेकड्या हिरवीगार झाडे पाहिली आणि ते त्या सर्व ठिकाणी पूजा करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर बळी आणि संतापदायक नैवेद्य नेले सुंदर गंध निर्माण करणारे यज्ञ त्यांनी केले, त्यांनी तेथे पेये अर्पण करण्यासाठी नेली.
28. For when I had brought H935 them into H413 the land H776 , for the which H834 I lifted up H5375 H853 mine hand H3027 to give H5414 it to them , then they saw H7200 every H3605 high H7311 hill H1389 , and all H3605 the thick H5687 trees H6086 , and they offered H2076 there H8033 H853 their sacrifices H2077 , and there H8033 they presented H5414 the provocation H3708 of their offering H7133 : there H8033 also they made H7760 their sweet H5207 savor H7381 , and poured out H5258 there H8033 H853 their drink offerings H5262 .
29. मी इस्राएली लोकांना विचारले की तुम्ही ह्या उच्चस्थानी कशा करिता जात आहात? आज देखिल ते उच्चस्थान आहे.”
29. Then I said H559 unto H413 them, What H4100 is the high place H1116 whereunto H834 H8033 ye H859 go H935 ? And the name H8034 thereof is called H7121 Bamah H1117 unto H5704 this H2088 day H3117 .
30. देव म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनी अशा सर्व वाईट गोष्टी केल्या म्हणून त्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो, तुमच्या पूर्वजांनी केलेली कृत्ये करुन तुम्ही स्वत:ला अमंगळ करुन घेतले आहे, गलिच्छ करुन घेतले आहे, तुम्ही वेश्येप्रमाणे वागला आहात. तुमच्या वाडवडिलांनी पूजलेल्या भयंकर दैवतांसाठी तुम्ही माझा त्याग केला.
30. Wherefore H3651 say H559 unto H413 the house H1004 of Israel H3478 , Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Are ye H859 polluted H2930 after the manner H1870 of your fathers H1 ? and commit ye whoredom H2181 H859 after H310 their abominations H8251 ?
31. तुम्ही तुमच्या पूर्वजांनी अर्पण केलेल्या गोष्टीच आजही दैवताला अर्पण करीत आहात. तुमच्या खोट्या देवांना बळी म्हणून तुम्ही स्वत:चीच मुले आगीत टाकीत आहात. आजसुद्धा तुम्ही त्या घाणेरड्या, अमंगळ देवांबरोबर स्वत:ला घाणेरडे करुन घेत आहात. मी तुम्हाला माझ्याजवळ येऊ देईन आणि तुम्हाला सल्ला देईन. उपदेश करीन असे खरंच तुम्हाला वाटते का? मी परमेश्वर प्रभू आहे. मी स्वत:ची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की मी तुमच्या प्रश्र्नांना उत्तर देणार नाही वा तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही.
31. For when ye offer H5375 your gifts H4979 , when ye make your sons H1121 to pass H5674 through the fire H784 , ye H859 pollute yourselves H2930 with all H3605 your idols H1544 , even unto H5704 this day H3117 : and shall I H589 be inquired of H1875 by you , O house H1004 of Israel H3478 ? As I H589 live H2416 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 , I will not H518 be inquired of H1875 by you.
32. तुम्हाला इतर राष्ट्रांसारखे व्हायचे आहे असे सारखे तुम्ही म्हणत राहता. पण तुमचा उद्देश आणि इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांतील लोकांसारखे वागता. तुम्ही लाकडाच्या तुकड्यांची दगडांची (मूर्तीची) पूजा करता.”
32. And that which cometh H5927 into H5921 your mind H7307 shall not H3808 be at all H1961 H1961 , that H834 ye H859 say H559 , We will be H1961 as the heathen H1471 , as the families H4940 of the countries H776 , to serve H8334 wood H6086 and stone H68 .
33. परमेश्वर, माझा देव, म्हणतो, “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी राजा म्हणून तुमच्यावर राज्य करीन. पण मी सामर्थ्यशाली हात तुमच्यावर उगारीन. तुम्हाला शिक्षा करीन. माझा तुमच्यावरचा क्रोध मी प्रकाट करीन.
33. As I H589 live H2416 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 , surely H518 H3808 with a mighty H2389 hand H3027 , and with a stretched out H5186 arm H2220 , and with fury H2534 poured out H8210 , will I rule H4427 over H5921 you:
34. मी ह्या इतर राष्ट्रांतून तुम्हाला बाहेर काढीन. इतर राष्ट्रांत तुम्हाला पसरविले पण मी तुम्हाला ह्या सर्व देशांतून परत आणून एकत्र करीन. मग मी माझा हात तुमच्यावर उचलून तुम्हाला शिक्षा करीन. मी तुमच्यावर माझा राग किती आहे हे दाखवून देईल.
34. And I will bring you out H3318 H853 from H4480 the people H5971 , and will gather H6908 you out of H4480 the countries H776 wherein H834 ye are scattered H6327 , with a mighty H2389 hand H3027 , and with a stretched out H5186 arm H2220 , and with fury H2534 poured out H8210 .
35. मी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच वाळवंटात नेईन. पण तेथे इतर राष्ट्रे वसत असतील. आपण समोरासमोर उभे राहू मग मी तुमचा न्यायनिवाडा करीन.
35. And I will bring H935 you into H413 the wilderness H4057 of the people H5971 , and there H8033 will I plead H8199 with H854 you face H6440 to H413 face H6440 .
36. मिसरजवळच्या वाळवंटात मी जसा तुमच्या पूर्वजांचा न्यायनिवाडा केला तसाच मी तुमचाही करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
36. Like as H834 I pleaded H8199 with H854 your fathers H1 in the wilderness H4057 of the land H776 of Egypt H4714 , so H3651 will I plead H8199 with H854 you, saith H5002 the Lord H136 GOD H3069 .
37. “मी तुम्हाला अपराधी समजून, कराराप्रमाणे तुम्हाला शिक्षा करीन.
37. And I will cause you to pass H5674 under H8478 the rod H7626 , and I will bring H935 you into the bond H4562 of the covenant H1285 :
38. माझ्याविरुध्द गेलेल्या पापी लोकांना तुमच्या मातृभूमीतून मी हालवीन. ते इस्राएलमध्ये कधीच परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे पटेल.”
38. And I will purge out H1305 from H4480 among you the rebels H4775 , and them that transgress H6586 against me : I will bring them forth H3318 H853 out of the country H4480 H776 where they sojourn H4033 , and they shall not H3808 enter H935 into H413 the land H127 of Israel H3478 : and ye shall know H3045 that H3588 I H589 am the LORD H3068 .
39. इस्राएल लोकांनो, परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या, कोणाला “त्या अमंगळ मूर्तीची पूजा करावीशी वाटत असेल, तर खुशाल करु दे. पण नंतर माझ्या सल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्या गलिच्छ मूर्तीना बलिदान देऊन ह्यापुढे अजिबात माझ्या नावाला बट्टा लावू शकणार नाही.”
39. As for you H859 , O house H1004 of Israel H3478 , thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Go H1980 ye, serve H5647 ye every one H376 his idols H1544 , and hereafter H310 also , if H518 ye will not H369 hearken H8085 unto H413 me : but pollute H2490 ye my holy H6944 name H8034 no H3808 more H5750 with your gifts H4979 , and with your idols H1544 .
40. परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “लोकांनी माझ्या पवित्र डोंगरावर इस्राएलच्या उंच पर्वतावर माझी सेवा करण्यासाठी आलेच पाहिजे. सर्व इस्राएलचे लोक त्यांच्या भूमीवर असतील. ते त्यांच्या स्वत:च्या देशात असतील. माझा सल्ला विचारायला येण्याची तीच जागा आहे. तेथेच तुम्ही मला नैवेद्य दाखविला पाहिजे. त्या जागीच तुम्ही मला अर्पण करण्यासाठी तुमच्या पिकाचा पहिला भाग आणलाच पाहिजे. तुमची पवित्र दाने तेथेच तुम्ही मला दिली पाहिजेत.
40. For H3588 in mine holy H6944 mountain H2022 , in the mountain H2022 of the height H4791 of Israel H3478 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 , there H8033 shall all H3605 the house H1004 of Israel H3478 , all H3605 of them in the land H776 , serve H5647 me: there H8033 will I accept H7521 them , and there H8033 will I require H1875 H853 your offerings H8641 , and the firstfruits H7225 of your oblations H4864 , with all H3605 your holy things H6944 .
41. मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.
41. I will accept H7521 you with your sweet H5207 savor H7381 , when I bring you out H3318 H853 from H4480 the people H5971 , and gather H6908 you out of H4480 the countries H776 wherein H834 ye have been scattered H6327 ; and I will be sanctified H6942 in you before H5869 the heathen H1471 .
42. तुमच्या पूर्वजांना जी भूमी देण्याचे मी वचन दिले होते, त्या इस्राएलच्या भूमीत मी तुम्हाला परत आणीन, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजेल.
42. And ye shall know H3045 that H3588 I H589 am the LORD H3068 , when I shall bring H935 you into H413 the land H127 of Israel H3478 , into H413 the country H776 for the which H834 I lifted up H5375 H853 mine hand H3027 to give H5414 it to your fathers H1 .
43. तेथेच तुम्हाला अमंगळ करणाऱ्या तुमच्या वाईट कृत्यांची आठवण होऊन, तुम्ही शरमिंदे व्हाल.
43. And there H8033 shall ye remember H2142 H853 your ways H1870 , and all H3605 your doings H5949 , wherein H834 ye have been defiled H2930 ; and ye shall loathe yourselves H6962 in your own sight H6440 for all H3605 your evils H7451 that H834 ye have committed H6213 .
44. इस्राएल लोकांनो, तुम्ही खूप वाईट कृत्ये केलीत. त्यासाठी तुमचा सर्वनाश व्हायला पाहिजे होता. पण माझे नाव राखण्यासाठी तुम्हाला योग्य अशी शिक्षा मी केली नाही. ह्यावरुन तुम्हाला मीच देव आहे हे समजून येईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
44. And ye shall know H3045 that H3588 I H589 am the LORD H3068 , when I have wrought H6213 with H854 you for my name's sake H4616 H8034 , not H3808 according to your wicked H7451 ways H1870 , nor according to your corrupt H7843 doings H5949 , O ye house H1004 of Israel H3478 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 .
45. मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला,
45. Moreover the word H1697 of the LORD H3068 came H1961 unto H413 me, saying H559 ,
46. “मानवपुत्रा, यहूदाच्या दक्षिणेकडच्या भागाकडे, म्हणजे नेगेवकडे पाहा. नेगेवच्या रानाविरुद्ध बोल.
46. Son H1121 of man H120 , set H7760 thy face H6440 toward H1870 the south H8486 , and drop H5197 thy word toward H413 the south H1864 , and prophesy H5012 against H413 the forest H3293 of the south H5045 field H7704 ;
47. नेगेवच्या रानाला सांग, ‘परमेश्वराचे शब्द ऐका. प्रभू, माझा देव, असे म्हणाला की तुझ्या रानात आग लावण्याची मी तयारी केली आहे. ती आग प्रत्येक झाड-हिरवे वाळलेले जाळेल. ज्वाळा विझणार नाहीत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश आगीत जळेल.
47. And say H559 to the forest H3293 of the south H5045 , Hear H8085 the word H1697 of the LORD H3068 ; Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Behold H2009 , I will kindle H3341 a fire H784 in thee , and it shall devour H398 every H3605 green H3892 tree H6086 in thee , and every H3605 dry H3002 tree H6086 : the flaming H3852 flame H7957 shall not H3808 be quenched H3518 , and all H3605 faces H6440 from the south H4480 H5045 to the north H6828 shall be burned H6866 therein.
48. मी, परमेश्वराने, आग लावली हे सर्व लोकांना समजेल. ती विझणार नाही.”
48. And all H3605 flesh H1320 shall see H7200 that H3588 I H589 the LORD H3068 have kindled H1197 it : it shall not H3808 be quenched H3518 .
49. मग मी (यहेज्केल) म्हणालो, “बाप रे! परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे सांगितले, तर मी गोष्ट सांगत आहे. असे लोक म्हणतील हे खरेच घडून येईल. ह्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही.”
49. Then said H559 I, Ah H162 Lord H136 GOD H3069 ! they H1992 say H559 of me , Doth he H1931 not H3808 speak H4911 parables H4912 ?