Bible Language

Exodus 20 (MRV) Marathi Old BSI Version

1 मग देव म्हणाला,
2 “मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
3 “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.
4 “तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
5 त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
7 “परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.
8 “शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
9 आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस;
10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
12 “तू आपल्या बापाचा आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
13 “कोणाचाही खून करु नकोस.
14 “व्यभिचार करु नकोस.
15 “चोरी करु नकोस.
16 “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”
18 ह्या वेळेपर्यंत तेथील लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला पर्वतातून धूर वर चढताना पाहिला; तेव्हा लोक घाबरले भीतीने त्यांचा थरकांप झाला. ते पर्वतापासून दूर उभे राहिले.
19 नंतर लोक मोशेला म्हणाले, “तुला जर आमच्याशी बोलावयाचे असेल तर तू खुशाल बोल; आम्ही ऐकू; परंतु कृपा करून देवाला आमच्याशी बोलू देऊ नकोस; तो बोलेल तर आम्ही मरुन जाऊ.”
20 मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका! कारण परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो हे दाखविण्यासाठी आणि तुम्ही त्याचा मान राखून त्याचे भय धरावे पाप करु नये हे दाखविण्यासाठी तो आला आहे.”
21 नंतर मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे त्याला भेटावयास गेला, तो पर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले.
22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग, ‘मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.
23 माझ्या स्पर्धेत तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती करु नये असे खोटे देव तुम्ही करता कामा नये.”
24 “माझ्यासाठी मातीची एक विशेष वेदी बांधा आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे ह्यांची होमार्पणे शांत्यर्पणे वाहा; माझी आठवण व्हावी म्हणून मी सांगतो त्या प्रत्येक जागी हे करा मग मी येईन तुम्हाला आशीर्वाद देईन.
25 तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती चिऱ्याच्या दगडाची नसावी; जर वापरावयाचा दगड चिऱ्याचा बनविण्यासाठी तू त्याला कसले हत्यार लावशील तर ती वेदी मी मान्य करणार नाही.
26 आणि वेदीकडे जाण्यासाठी तुम्ही पायज्या करु नका कारण पायऱ्यांवरून वेदीकडे चढून जाताना लोकांना तुमची नन्गता दिसेल.”‘

English

  • Versions

Tamil

  • Versions

Hebrew

  • Versions

Greek

  • Versions

Malayalam

  • Versions

Hindi

  • Versions

Telugu

  • Versions

Kannada

  • Versions

Gujarati

  • Versions

Punjabi

  • Versions

Urdu

  • Versions

Bengali

  • Versions

Oriya

  • Versions

Marathi

  • Versions