Bible Versions
Bible Books

Daniel 7 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 बाबेलचा राजा बेलशस्सर ह्याच्या कारकिर्दोच्या पहिल्या वर्षो. दानीएलला एक स्वप्न पडले. झोपलेला असताना त्याला दृष्टान्त झाले. ते दृष्टान्त दानीएलने लिहून ठेवले.
2 दानीएल म्हणाला “मला रात्री दृष्टान्त झाला.दृष्टान्तत दानीएलने चारी दिशांनी वारा वाहात होता. त्या वाऱ्याने समुद्र खवळला.
3 समुद्रात चार प्राणी बाहेर येताना मला दिसले. ते आकाराने मोठे होते एकमेकांपेक्षा वेगळे होते.
4 पहिला प्राणी सिंहासारखा होता त्याला गरुडासारखे पंख होते. मी त्या प्राण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याचे पंख कापण्यात आले. तो जमिनीपासून वर उचलला गेला होता. त्यामुळे तो माणसारसाखा जमिनीवर दोन पायांवर उभा राहिला होता. त्याला मानवी हदय (मन) देण्यात आले होते.
5 “मग मी माझ्यासमोर दुसरा प्राणी पाहिला. तो अस्वलासारखा दिसत होता. तो त्याच्या एका अंगाने उचलला गेला होता. त्याच्या तोंडात त्याच्या दातांच्यामध्ये तीन फासव्व्या होत्या, “ऊठ आणि तुला पाहिजे तिकडे मांस खा” असे त्याला सांगितले गेले.
6 “ह्यानंतर मी पाहिले मला माझ्यासमोर तिसरा प्राणी दिसला. तो चित्याप्रमाणे होता. त्याच्या पाठीवर चार पंख होते. ते पक्ष्यांच्या पंखासारखे होते. त्याला चार डोकी होती. त्याला सत्ता गाजवायचा अधिकार दिला होता.
7 “त्यानंतर, मला दृष्टान्तात चौथा प्राणी दिसला. तो फारच नीच भयंकर दिसत होता. तो फारच बलवान होता. त्याला लोखंडाचे मोठे दात होते, तो त्याच्या बळींना चिरडून खात होता आणि बळींचे उरलेले अवशेष तुडवीत होता. हा चौथा प्राणी मी पाहिलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा भिन्न होता. त्याला दहा शिंगे होती.
8 “मी त्या शिंगाबद्दल विचार करीत असतानाच, त्या शिंगामध्ये आणखी एक शिंग उगवले. ते लहान होते, त्या शिंगावर माणसाच्या डोव्व्याप्रमाणे डोळे तोंड होते. ते तोंड प्रौढी मिरवीत होते. त्या लहान शिंगाने तीन इतर शिंगे उपटून टाकली. चवथ्या प्राण्याचा न्यायनिवाडा
9 “मी पाहतो तर आपापल्या जागी सिंहासने मांडली गेली त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे कपडे केस कापसाप्रमाणे सफेद होते. त्याचे सिंहासन अग्नीचे होते. सिंहासनाची चाके ज्वालांची केलेली होती.
10 प्राचीन राजाच्या समोरून अग्नीची नदी वाहत होती करोडो लोक त्याची सेवा करीत होते. कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. हे दृश्य, न्यायालय सुरू होण्याच्या तयारीत आहे सर्वांची खाती आत्म उघडली जाणार आहेत, अशा प्रकारचे होते.
11 “मी पुन्हा पाहात होतो. लहान शिंग प्रौढी मिरवीतच होते. चौथ्या प्राण्याला मारेपर्यंत मी निरीक्षण केले. त्याच्या शरीराचा नाश करून ते आगीत फेकून देण्याच आले.
12 इतर प्राण्यांची सत्ता अधिकार काढून घेण्यात आले. पण काही निशिचत काळापर्यंत जगण्याची परवानगी त्यांना देण्यात आली.
13 माझ्या रात्रीच्या दृष्टान्तात मला मनुष्यप्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले. तो ढगांवरून येत होता. तो प्राचीन राजाकडे आला. त्याला राजासमोर आणण्यात आले.
14 “मग त्या मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव संपूर्ण सत्ता देण्यात आली सर्व लोक राष्ट्रे निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते. त्याची सत्ता चिरंतन होती. त्याचे राज्य कायमचे होते. त्याचा कधीही नाश होणार नव्हता.
15 “मी, दानीएल, गोंधळलो चिंतेत पडलो. मला दिसलेल्या दृष्टान्तानी मला काळजी वाटू लागली.
16 उभे राहिलेल्यापैकी एकाजवळ मी गेलो. मी त्याला ह्या सर्वांचा अर्थ विचारला. मग त्याने मला तो सांगितला. त्याने मला ह्या सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट करून सांगितला.
17 This verse may not be a part of this translation
18 This verse may not be a part of this translation
19 “मला चौथा प्राणी म्हणजे त्याचा अर्थ काय हे जाणुन घ्यायची इच्छा होती.तो चौथा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा होता. तो फार भयंकर होता. त्याला लोखंडाचे हात काशाची नखे होती. त्याच्या बळीला शिकारीला तो संपपूर्णपणे चिरडडून टाकून खात होता राहिलेले बळींचे अवशेष पायाखाली तुडवीत होता.
20 त्याच्या डोक्यावरील दहा शिंगाबद्दलही मला जाणून घ्यायचे होते. उगवलेल्या लहान शिंगाबद्दलही मला उत्सुकता होती. त्या लहान शिंगाने इतर दहा शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगाच्या मानाने क्षुद, होते त्याला डोळे होते, तोंड होते, आणि ते तोंड सतत बढाया मारीत होते.
21 “मी पाहत असतानाच, त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांवर हल्ला करून लढण्यास सुरवात केली. ते शिंग लोकांना ठार करू लागले.
22 प्राचीन राजाने येऊन, त्याचा न्यायनिवाडा करीपर्यंत त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांना ठार मारणे चालूच ठेवले. प्राचीन राजाने लहान शिंगाचा निकाल घोषित केला. त्याचा देवाच्या खास माणसांना फायदा झाला त्यांना राज्य मिळाले.
23 “त्याने मला पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले: “चौथा प्राणी म्हणजे पृथ्वीवर येणारे चौथे राज्य. ते इतर राज्यांपेक्षा भिन्न असेल. ते सर्व पृथ्वीवरच्या माणसांचा नाश करील, ते सर्व राष्ट्रांना तुडवून चिरडून टाकील.
24 ती दहा शिंगे म्हणजे ह्या चौथ्या राज्याचे दहा राजे आहेत. ह्या दहा राजानंतर आणखी एक राजा येईल त्याच्या आधीच्या राज्य करणाऱ्या राज्यांपेक्षा हा भिन्न असेल. तो तीन राजांचा पराभव करील.
25 हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा अर्धा वेळ. त्याच्या सत्तेखाली राहातील.
26 “पण न्यायालय काय घडावे ते ठरवील.मग त्या राजाची सत्ता काढून घेण्यात येईल. त्याच्या राज्याचा पूर्णपणे अंत होईल.
27 मग देवाचे खास लोक राज्य करतील . ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”
28 “येथे स्वप्न संपले मी दानीएल खूप घाबरलो भीतीने माझा चेहरा पांढराफटक पडला. मी पाहिलेल्या ऐकलेल्या ह्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×