Bible Versions
Bible Books

Matthew 1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: तो दाविदाच्या कुळात जन्मला. दावीद अब्राहामाच्या कुळातील होता.
2 अब्राहाम इसहाकचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब याहूदा त्याच्या भावांचा पिता होता.
3 यहूदा पेरेस जेरहाचा पिता होता. (त्यांची आई तामार होती.) पेरेस हेस्रोनाचा पिता होता. हेस्रोन रामाचा पिता होता.
4 रामा अम्मीनादाबाचा पिता होता. अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता. नहशोन सल्मोनाचा पिता होता.
5 सल्मोन बवाजाचा पिता होता. (बवाजाची आई राहाब होती.) बवाज ओबेदचा पिता होता. (ओबेदची आई रूथ होती) ओबेद इशायचा पिता होता.
6 इशाय दावीद राजाचा पिता होता. दावीद शलमोनाचा पिता होता. (शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)
7 शलमोन रहबामचा पिता होता. रहबाम अबीयाचा पिता होता. अबीया आसाचा पिता होता.
8 आसा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट योरामाचा पिता होता. योराम उज्जीयाचा पिता होता.
9 उज्जीया योथामचा पिता होता. योथाम आहाजचा पिता होता. आहाज हिज्कीयाचा पिता होता.
10 हिज्कीया मनश्शेचा पिता होता. मनश्शे आमोनचा पिता होता. आमोन योशीयाचा पिता होता.
11 योशीया यखन्या त्याचे भाऊ यांचा पिता होता. (जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले.)
12 त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: यखन्या शल्तीएलचा पिता होता. शल्तीएल जरूब्बाबेलचा पिता होता.
13 जरूब्बाबेल अबीहूदचा पिता होता. अबीहूद एल्याकीमचा पिता होता. एल्याकीम अज्जुराचा पिता होता.
14 अज्जुर सादोकचा पिता होता. सादोक याखीमचा पिता होता. याखीम एलीहूदचा पिता होता.
15 एलीहूद एलाजारचा पिता होता. एलाजारचा मत्तानचा पिता होता. मत्तान याकोबाचा पिता होता.
16 याकोब योसेफाचा पिता होता. योसेफ मरीयेचा पती होता. मरीया येशूची आई होती. येशूला ‘ख्रिस्त’ म्हटले आहे.
17 याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यत चौदा पिढ्या झाल्या. (लूका2.1-7)
18 येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले.
19 तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला.
20 पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा, मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे.
21 त्याचे नाव तू येशू4 ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”
22 हे सर्व यासाठी घडले की, प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते, त्याची पूर्तता व्हावी.
23 “कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”
24 जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्र केले. 25पण तिने मुलाला जन्म देईपर्यत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले.
25 This verse may not be a part of this translation
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×