Bible Books

7
:

1. चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
2. प्रेतयात्रेला जाणे हे एखाद्या समारंभाला जाण्यापेक्षा चांगले असते. का? कारण सगव्व्या माणसांना मरणे भाग असते आणि प्रत्येक जिवंत माणसाने हे मान्य करायला हवे.
3. दु:ख हे हास्यापेक्षा चांगले असते. का? कारण जेव्हा आपला चेहरा दु:खी असतो तेव्हा आपले हृदय चांगले होते.
4. शहाणा माणूस मरणाचा विचार करतो पण मूर्ख माणूस फक्त वेळ चांगला जाण्याचाच विचार करतो.
5. शहाण्या माणसाकडून टीका होणे हे मूर्खाकडून स्तुती होण्यापेक्षा चांगले असते.
6. मूर्खाच्या हास्याची काहीच किंमत नसते. ते भांडे गरम करण्यासाठी काट्यांचा जाळ करण्यासारखे आहे. काटे लवकर जळून जातात आणि भांडे मात्र गरम होत नाही.
7. एखाद्याने पुरेसे पैसे दिले तर शहाणा माणूससुध्दा त्याचे शहाणपण विसरुन जाईल. तो पैसा त्याच्या समजूतदारपणाचा नाश करतो.
8. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापेक्षा एखादी गोष्ट संपवणे अधिक चांगले असते. सहनशील आणि प्रेमळ असणे हे गर्विष्ठ आणि अधीर असण्यापेक्षा चांगले असते.
9. चटकन राग येऊ देऊ नका. का? कारण रागावणे हा मूर्खपणा आहे.
10. “पूर्वी आयुष्य खूप चांगले होते.” असे कधीच म्हणू नका. “काय झाले?” शहाणपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारू देत नाही.
11. जर तुमच्याजवळ मालमत्ता असेल तर तिच्या जोडीला शहाणपण असणे अधिक चांगले. शहाण्या लोकांना खरोखरच जास्त संपत्ती मिळते.
12. शहाणपण पैसा संरक्षण करू शकतो. तथापि शहाणपणाने मिळविलेले ज्ञान अधिक चांगले असते कारण ते जीवन वाचविते.
13. देवाने केलेल्या गोष्टी पाहा. एखादी गोष्ट चुकीची आहे असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही ती बदलू शकत नाही.
14. जेव्हा आयुष्य चांगले असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या आणि जेव्हा ते कठीण असते तेव्हा देव आपल्याला चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही वेळा देतो हे लक्षात ठेवा. आणि भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाही कळत नाही.
15. माझ्या छोट्याशा आयुष्यात मी सगळे काही पाहिले आहे. चांगली माणसे तरुणपणीच मेलेली मी पाहिली आहेत. आणि वाईट माणसे खूप वर्षे जगलेली मी पाहिली आहेत.
16. This verse may not be a part of this translation
17. This verse may not be a part of this translation
18. यांतले थोडे आणि त्यातले थोडे असे व्हायचा प्रयत्न करा. देवाचे भक्त सुध्दा काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी करतात.
19. This verse may not be a part of this translation
20. This verse may not be a part of this translation
21. लोक बोलतात त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमचा नोकर तुमच्याविषयी वाईट बोलत असलेला तुम्ही ऐकाल.
22. आणि तुम्ही सुध्दा इतरांविषयी बरेचदा वाईट बोललेले आहा हे तुम्हाला माहीत आहे.
23. मी माझे शहाणपण वापरून या गोष्टींचा विचार केला. मला खरोखरच शहाणे व्हायचे होते. पण ते अशक्य होते.
24. गोष्टी अशा का आहेत ते मला खरोखरच कळत नाही. हे कोणालाही कळणे फार कठीण आहे.
25. मी खूप अभ्यास केला आणि खरे शहाणपण शोधण्याचा कसून प्रयत्न केला. मी प्रत्येक गोष्टींसाठी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी काय शिकलो? मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुध्द वेडेपणा आहे.
26. मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
27. This verse may not be a part of this translation
28. This verse may not be a part of this translation
29. “मी आणखी एक गोष्ट शिकलो. देवाने माणसाला चांगले बनवले. पण माणसांनीच वाईट होण्याचे अनेक मार्ग शोधून काढले.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×