Bible Books

:
-

1. इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
2. यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
3. लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली.
4. पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.
5. लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
6. पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?
7. पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली.
8. देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×