Bible Versions
Bible Books

Psalms 87 (IRVMR) Indian Revised Version - Marathi

1 {सीयोनेत राहण्याचा मान} PS परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
2 याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास
सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
3 हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
4 राहाब * मिसर देश आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन.
पाहा, पलिष्टी, सोर कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
5 सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता;
आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
6 लोकांची नोंदणी करताना,
ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
7 गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की,
माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×