Bible Books

:

1. धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.
2. तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो.
3. पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या.
4. तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता?
कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता?
तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?
5. तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता,
तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता.
6. नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत.
तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का?
7. तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.
8. तू आपले चिन्हे दारांच्या खांबाच्या आड ठेवले,
तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले.
तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस.
9. तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस.
तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस.
10. तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.”
आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.
11. तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस?
तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस.
मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही.
12. मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता,
ते तुला मदत करणार नाही.
13. जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मूर्तींचा समुदाय तुला सोडवो.
त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल,
आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल.
14. तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा,
माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका.
15. {देवाचे साहाय्य बरे करणे} PS कारण जो उंच परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो,
मी उंच आणि पवित्र जागी राहतो,
नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला,
अनुतापी नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.
16. कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही.
कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील.
17. कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो.
पण तरीही तो मागे हटला आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला.
18. मी त्याचे मार्ग पाहिले आहेत,
पण मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल.
19. आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला,
आणि जो जवळ आहे त्यास शांती, असो, असे परमेश्वर म्हणतो, आणि मी त्यास निरोगी करीन.
20. पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही,
आणि त्यांची जले हे चिखल माती ढवळून काढतात.
21. “पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×