Bible Versions
Bible Books

Job 40 (IRVMR) Indian Revised Version - Marathi

1 परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला,
2 “तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास.
तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस.
आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
3 मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले,
4 मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू?
मी तुला उत्तर देऊ शकत नाही.
मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
5 पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही.
मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.
6 नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला:
7 तू आता कंबर कसून उभा राहा
आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
8 मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस.
9 तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तीशाली आहेत का?
देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
10 तू स्वत:ला महीमा प्रताप यांचे भुषण कर,
तेज वैभव हे धारण कर.
11 तुझ्या रागाला भरती येवू दे,
आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण
आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
12 होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर
वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.
13 त्यांना चिखलात पुरुन टाक
त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
14 मग मी तुझी सत्यता जाणेल,
मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.
15 तू बेहेमोथ * मोठा प्राणी कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले.
तो बैलासारखे गवत खातो.
16 त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे.
त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
17 त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते.
त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
18 त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत.
त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
19 बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे.
परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
20 डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात
तिथले गवत खातो.
21 तो कमळाच्या झाडाखाली झोपतो.
दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
22 कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते
तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
23 नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही
यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.
24 त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल.
किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×