Bible Books

:

1. {इस्त्राएलाचे पुत्र} PS ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
2. दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद आशेर. रूथ 4:18-22; मत्त. 1:2-6; लूक 3:31-33 PEPS
3. {यहूदाचे वंशज} PS एर, ओनान शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
4. यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते. PEPS
5. हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
6. जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल दारा.
7. जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध * त्याने देवाला समर्पित केलेली लूट ठेवून इस्राएली लोकांवर आपत्ती आणली. यहोशवा अध्याय 7 पाहा केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
8. एथानाचा पुत्र अजऱ्या होता. PEPS
9. यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
10. अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
11. नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
12. बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला. PEPS
13. इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
14. चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
15. सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला. PEPS
16. सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
17. अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते. PEPS
18. हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
19. अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
20. हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल. PEPS
21. नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
22. सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती. PEPS
23. पण गशूर आणि अराम यांनी याईर कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
24. हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला. PEPS
25. यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.
26. यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
27. यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
28. शम्मय यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र. PEPS
29. अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
30. सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र होताच मेला.
31. अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
32. शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र होताच मेला.
33. पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती. PEPS
34. शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
35. शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. PEPS
36. अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
37. जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
38. ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला. PEPS
39. अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
40. एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
41. शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला. PEPS
42. यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
43. कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
44. शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय. PEPS
45. शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
46. कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
47. रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा शाफ हे यहदायचे पुत्र. PEPS
48. माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
49. तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या. PEPS
50. ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
51. बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ. PEPS
52. किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
53. आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले. PEPS
54. सल्माचे वंशज बेथलेहेम नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
55. शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×