Bible Versions
Bible Books

Psalms 1 (IRVMR) Indian Revised Version - Marathi

1 {नीतिमान अनीतिमान} PS आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
2 परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र दिवस ध्यान लावतो.
3 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या,
आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या,
ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा होईल तो जे काही करेल ते साध्य होईल.
4 परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
5 म्हणून दुष्ट लोक न्यायात पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
6 कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो.
परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×