Bible Books

:

1. {गायनवादन करणाऱ्यांचा गट} PS दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
2. आसाफाच्या वंशातले:
जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
3. यदूथूनाचे वंशज:
गदल्या, सारी, यशया, हशब्या मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. PEPS
4. हेमानाचे वंशज:
बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
5. हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले. PEPS
6. हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
7. ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
8. त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या कामे वाटून घेतली. PEPS
9. तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत:
पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली;
दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
10. तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
11. चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
12. पाचवी नथन्याची त्याचे पुत्र नातलग यामधून बाराजण.
13. सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
14. सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
15. यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
16. नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
17. दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
18. अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
19. बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
20. तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
21. चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
22. पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
23. सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
24. सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
25. अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
26. एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
27. विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
28. एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
29. बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
30. तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
31. चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×