1. आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा.
2. तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर.
3. कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर.
4. कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्यास उठवून उभे राहायला मदत करा.
5. बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकांचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे.
6. वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.
7. हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल.
8. नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हास लागणार नाही.
9. द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही * अपवित्र मानले जाईल .
10. बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
11. लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका.
12. वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा. PS
13. {पतिव्रतेविषयी नियम} PS एखाद्या मनुष्यास लग्न केल्यावर पत्नीशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर पत्नी आवडेनाशी झाली आणि
14. मी या स्त्रीशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.
15. तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.
16. मुलीच्या वडिलाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्यास नकोशी झाली आहे.
17. त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी.
18. यावर गावच्या वडिलांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.
19. त्यास शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने पत्नी म्हणून तिचा स्विकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
20. पण पत्नीबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर;
21. गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही मूर्खपणाची गोष्ट केली आहे. आपल्या वडिलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
22. एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
23. एखाद्या कुमारिकेची मागणी झालेली असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर
24. त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची पत्नी होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकावा.
25. पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.
26. त्या मुलीला काही करु नये. देहांत शासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.
27. त्यास ही मुलगी रानात आढळली, त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
28. वाग्दत्त झालेली नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास
29. त्याने मुलीच्या वडीलांना पन्नास शेकेल रुपे द्यावी. आता ती त्याची पत्नी झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
30. “आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.” PE