Bible Books

:
-

1. {बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश} (मार्क 1:2-8; लूक 3:1-20) PS बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की,
2. “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” PEPS
3. कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की,
“अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली;
‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’
त्याच्या ‘वाटा सरळ करा.’ ” PEPS
4. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ रानमध होता.
5. तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला.
6. ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला. PEPS
7. परंतु परूशी सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?
8. तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;
9. आणि अब्राहाम तर ‘आमचा पिता आहे’, असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका; कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे.
10. आणि झाडांच्या मुळांशी आताच कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल अग्नीत टाकले जाईल. PEPS
11. मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने अग्नीने करणार आहे.
12. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील आपले गहू कोठारात साठवील; पण भूस विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.” मार्क 1:9-11; लूक 3:21, 22; योहा. 1:29-34 PEPS
13. {योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा} PS यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला;
14. परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?
15. येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.
16. मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना आपणावर येताना पाहीले,
17. आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×