Bible Books

:

1. {मोठी कलावंतीण श्वापद} PS मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो.
2. पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले.”
3. तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी दहा शिंगे होती.
4. त्या स्त्रीने जांभळी किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता;
5. तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची अमंगळ गोष्टींची आई.
6. आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त * साक्षीचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.
7. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, ज्याला सात डोकी आणि दहा शिंगे आहेत त्या पशूचे रहस्य सांगतो. PEPS
8. आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे. PEPS
9. इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत;
10. आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल.
11. आणि तो जो पशू होता आणि नाही, तो आठवा राजा आहे; तो सातांपासून झालेला आहे; आणि नाशात जात आहे.
12. आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.
13. ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात.
14. ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.”
15. आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत.
16. आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील.
17. कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशूला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे.
18. आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×