Bible Books

3
:

1. {तप्त भट्टीतून सुटका} PS नबुखद्नेस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला त्याची उंची साठ हात आणि रुंदी सात हात होती, त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली.
2. नंतर नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी हयांस निरोप पाठवला. PEPS
3. नंतर प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक, प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की, नबुखद्नेस्सर राजाने स्थापित केलेल्या पुतळ्याचे समर्पण व्हावे.
4. तेव्हा दवंडी देणारा ओरडला, “अहो विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनो,
5. ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, विणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगीत ऐकाल त्यावेळी त्या सुवर्ण पुतळयास दंडवत करा ज्याची स्थापना नबुखद्नेस्सर राजाने केली आहे. PEPS
6. जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.”
7. मग शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी इत्यादी वाद्यांचा आवाज ऐकताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळयास पालथे पडून दंडवत केले जो नबुखद्नेस्सर राजाने स्थापला होता. PEPS
8. आता यावेळी काही खास्द्यांनी जवळ येऊन यहूद्यांवर दोषारोप केला.
9. ते नबुखद्नेस्सर राजास म्हणाले, “महाराज चिरायु असा.
10. महाराज तुम्ही असे फर्मान काढले आहे ना, की, जो कोणी शिंग, बासरी, सतार, विणा, पुंगी आणि इतर वाद्याचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण् पुतळयास दंडवत करावे. PEPS
11. जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल.
12. आता येथे काही यहूदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलाच्या प्रांतात केली, त्यांची नावे शद्रख, मेशख अबेदनगो ही आहेत. हे लोक, राजा, आपली पर्वा करत नाहीत, ते तुमच्या देवास नमन करत नाहीत, त्याची सेवा करत नाही, किंवा तुमच्या पुतळ्यास दंडवत करत नाहीत, ज्याची तुम्ही स्थापना केली आहे.” PEPS
13. तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.
14. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “काय तुम्ही शद्रख, मेशख, अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली? की तुम्ही माझ्या स्थपलेल्या सुवर्ण पुतळयास नमन करून त्यास दंडवत करणार नाही? PEPS
15. आता जर तुम्ही तयार आहात तर, जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी आणि इतर वाद्ययांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळयापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे; पण जर तुम्ही नमन करणार नाही, तर तुम्हास त्वरीत तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे?” PEPS
16. शद्रख, मेशख, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “हे नबुखद्नेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही.
17. जर काही उत्तर आहे, तर ते हे की, ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त आग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे, आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडवील.
18. पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही.” PEPS
19. नबुखद्नेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विरूद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी.
20. नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की, शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका. PEPS
21. ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले.
22. राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रख, मेशख, अबेदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले.
23. तिथे ते पुरुष शद्रख, मेशख, अबेदनगो हातपाय बांधलेले असे त्या भट्टीत पडले. PEPS
24. नंतर नबुखद्नेस्सर चकीत होऊन त्वरीत उभा राहिला त्याने आपल्या सल्लागारास विचारले, “आपण त्या तिघांना बांधून भट्टीत टाकले ना?” त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे.
25. तो म्हणाला, मला असे दिसते की, चार माणसे अग्नीत मोकळे फिरत आहेत, त्यांना काही एक दुखापत झालेली नाही, चौथ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे. PEPS
26. तेव्हा नबुखद्नेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली “शद्रख, मेशख, अबेदनगो, सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या.” येथे या, नंतर शद्रख, मेशख, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले.
27. तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार ह्यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या त्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही. PEPS
28. नबुखद्नेस्सर म्हणाला या आपण शद्रख, मेशख, अबेदनगो यांच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्याने आपला दिव्यदूत पाठवला आणि ज्या आपल्या सेवकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला, आणि राजाची आज्ञा पालटवली, आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणाला नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली त्यांना त्याने सोडवले आहे. PEPS
29. त्यामुळे मी ठराव करतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणतीही भाषा बोलणारे जर शद्रख, मेशख, अबेदनगो, यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.
30. नंतर राजाने शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बाबेलच्या परगण्यात बढती दिली. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×