Bible Books

5
:

1. {भिंतीवरील लिखाण} PS काही वर्षानंतर, एकदा बेलशस्सर राजाने आपल्या हजारो सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्या समोर तो द्राक्षरस प्याला.
2. बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. PEPS
3. तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरूशलेमेतील देवाच्या मंदीरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली.
4. ते द्राक्षरस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले. PEPS
5. त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राजास वाचता येईल.
6. तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. PEPS
7. राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की, जे भूतविद्या करणारे खास्दी लोक, ज्योतिषी यांना घेवून या. राजा बाबेलातील ज्ञानी लोकांस म्हणाला, “जो कोणी हे लिखान वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोफ देण्यात येईल. जो राज्यांतील तीन राज्यकर्त्यातील एक होईल. PEPS
8. राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.”
9. तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले. PEPS
10. राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका. PEPS
11. आपल्या राज्यात एक असा पुरूष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या वडिलाच्या राज्यात, प्रकाश, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले आपला बाप राजा नबुखद्नेस्सराने त्यास सर्व जादूगार भूतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतीषी यावर प्रशासक म्हणून त्यास नेमले.
12. उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.” PEPS
13. नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या वडिलाने पकडले होते.
14. मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे. PEPS
15. मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना ह्याचा अर्थ सांगता येईना.
16. मी तुझ्याबाबतीत ऐकले आहे की तू ह्याचा अर्थ सांगून हे सोडवू शकतो आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र तुझ्या गळयात सोन्याचा गोफ देवून तुला राज्यातील ज्ञानी प्रशासकांपैकी एक प्रशासक करील.” PEPS
17. नंतर दानीएलाने राजास उत्तर दिले, “तुझ्या भेटी तुलाच राहू दे आणि तुझी बक्षीसे दुसऱ्यांना दे तरीही मी लिखान वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो.
18. हे राजा सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सराला राज्य, महानता, प्रतिष्ठा आणि वैभव दिले.
19. त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत त्यास भित होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे, किंवा जीवन देत असे. PEPS
20. पण जेव्हा त्याचे हृदय ताठ झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला तो मुद्दामपणे वागला तेव्हा त्यास राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरावण्यात आले.
21. त्यास मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशूसारखे झाले आणि तो रानगाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला. PEPS
22. हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.
23. तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी, आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याला आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड, आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत, किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस.
24. म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले. PEPS
25. हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’
26. ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे.
27. तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस.
28. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.” PEPS
29. तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे.
30. त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याला ठार मारण्यात आले.
31. आणि दारयावेश मेदी हा बासष्ट वर्षाचा असता राजा झाला. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×