Bible Books

:
-

1. {परमेश्वर तुझा रक्षक आहे} PS मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो.
मला मदत कोठून येईल?
2. परमेश्वर जो आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करणारा
त्याकडून माझी मदत येते.
3. तो तुझा पाय घसरू देत नाही;
जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
4. पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता
कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
5. परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे;
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
6. दिवसा तुला सूर्य किंवा
रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
7. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील;
तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
8. परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील,
त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×