Bible Books

:
-

1. {निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती} PS हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो;
तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल.
2. जो तू प्रार्थना ऐकतोस,
त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.
3. दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे.
आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.
4. ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे,
याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे.
तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या
उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.
5. हे आमच्या तारणाऱ्या देवा,
जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा
आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस,
तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस.
6. कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून,
पर्वत दृढ केले आहेत.
7. तू गर्जणाऱ्या समुद्राला,
त्यांच्या लाटांच्या गर्जनेला
आणि लोकांचा गलबला शांत करतो.
8. जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात;
तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस.
9. तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस;
तू तिला फारच समृद्ध करतोस;
देवाची नदी जलपूर्ण आहे;
तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस.
10. तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस;
तू तिचे उंचवटे सपाट करतोस;
तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस.
तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस
11. तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस;
तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो.
12. रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात
आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत.
13. कुरणांनी कळप पांघरले आहेत;
दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत.
ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×