Bible Books

:
-

1. {गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना} PS हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे;
माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
2. वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून,
अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,
3. त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे.
त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.
4. याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात;
अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत;
5. ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात;
ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?
6. ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात,
आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे.
मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत.
7. परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील;
अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.
8. त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील;
जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.
9. सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील.
ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.
10. परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील;
सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×