Bible Books

:

1. दुर्जनांचा मत्सर करू नकोस,
आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.
2. कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते,
आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.
3. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते;
आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.
4. ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या
मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.
5. शूर मनुष्य बलवान असतो,
परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.
6. कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो;
आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो.
7. मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे;
वेशीत तो आपले तोंड उघडतो.
8. जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो,
लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात.
9. मूर्खाची योजना पाप असते,
निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो.
10. जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर,
मग तुझी शक्ती थोडीच आहे.
11. ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव,
ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.
12. जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.”
तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का?
आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का?
आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?
13. माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे,
कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
14. त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे;
जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे,
आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.
15. अरे दुष्टा, नीतिमानाच्या
घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस.
त्याच्या घराचा नाश करू नको!
16. कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी,
तो पुन्हा उठतो,
पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.
17. तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस,
आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.
18. उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही
आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.
19. जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको,
आणि दुष्टांचा मत्सर करू नको.
20. कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही
दुष्टांचा दिप मालवला जाईल.
21. माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग.
जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.
22. कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल,
आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे? PEPS
23. हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत.
न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.
24. जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस;
तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
25. पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल,
आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
26. जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो
तो ओठांचे चुंबन देतो.
27. तू आपले बाहेरचे काम आधी कर,
आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर,
आणि मग आपले घर बांध.
28. निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको,
आणि आपल्या वाणीने फसवू नको.
29. “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन.
मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.
30. मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून,
मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.
31. तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती,
त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती,
आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.
32. मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो.
नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
33. “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो,
थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”
34. आणि दारिद्र्य लुटारूसारखे,
आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×