Bible Books

:

1. {ज्ञान आणि अज्ञान ह्यांची घोषणा} PS ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले;
त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.
2. तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत;
तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे;
आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे,
तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.
3. तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि
ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
4. “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!”
ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
5. “या, माझे अन्न खा.
आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या.
6. तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा;
सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
7. जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो,
आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
8. निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल;
ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.
9. ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल;
नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल.
10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे,
आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
11. कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील,
आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील.
12. जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील,
पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.
13. मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे,
ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही.
14. ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते,
ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.
15. जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात,
जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,
16. “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!”
जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते.
17. “चोरलेले पाणी गोड लागते,
आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”
18. पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही,
तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×