1. {समुद्रलगतच्या रानाविषयी देववाणी} PS समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी.
जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.
2. दु:खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे,
विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो.
हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल,
मी तिचे सर्व उसासे थांबवीन.
3. यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत,
प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे.
जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
4. माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो.
रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.
5. त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले,
उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.
6. जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले,
तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.
7. जेव्हा तो रथ, घोडेस्वार,
गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील,
तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.
8. पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला,
हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो
आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.
9. आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे.
त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली,
आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
10. हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा!
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव,
ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.
11. {दुमाविषयी देववाणी} PS दूमा * अदोम विषयीचा घोषणा,
सेईर † अदोम येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
12. पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.
13. {अरबस्तानाविषयी देववाणी} PS अरेबिया विषयी घोषणा,
ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.
14. अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा,
पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.
15. कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी
आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.
16. कारण परमेश्वराने मला सांगितले,
एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.
17. फक्त थोडेच धनुर्धारी, वीर योद्धा केदार मध्ये उरतील, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर हे बोलला आहे. PE