Bible Books

:
-

1. बेल * बेल, ज्याला मर्दुक म्हणून सुधा ओळखले जाते, तो बाबेलाच्या मुख्य दैवातांपैकी एक होता. खाली वाकला आहे, नबो मर्दुकचा मुलगा झुकला आहे; त्यांच्या मूर्तींचे ओझे जनावरांवर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरांवर लादले आहे.
2. ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात; ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत,
परंतु ते स्वतःही बंदीवासात जातात.
3. याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही,
ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.
4. तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन.
मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.
5. तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? आणि मला कोणाशी सदृश्य लेखाल, या करता त्यांच्याशी आमची तुलना होईल?
6. लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात.
ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.
7. ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो त्या जागेतून हालत नाही.
ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.
8. या गोष्टींबद्दल विचार करा; तुम्ही बंडखोरांनो! कधीही दुर्लक्ष करू नका.
9. प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा,
कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.
10. मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे.
मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”
11. मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो;
होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.
12. चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐका.
13. मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×