Bible Books

:

1. {सोर सिदोनाविषयी देववाणी} PS सोर विषयी देववाणी,
तार्शीशच्या जहाजानों, आक्रोश करा कारण तुमच्या जहाजासाठी बंदर तुमच्यासाठी घर नाही,
असे कित्तीमच्या देशापासून त्यांना प्रगट करण्यात आले आहे.
2. समुद्रतीरीच्या रहिवाश्यांनों, आश्चर्यचकित व्हा,
तुम्ही सीदोनाचे व्यापारी,
जे तुम्ही समुद्रावरून प्रवास करता, ज्यांच्या प्रतिनीधींनी तुझ्या गरजा पूरवल्या.
3. आणि महान जलांवरून
नाईल नदीकाठी पिकलेले सर्व पीक, समुद्रा पलीकडून आणलेले सीहोर या भागातले धान्य ते सोर याकरीता आणले; ती राष्ट्रांची बाजारपेठ होती. PEPS
4. हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो,
“मी प्रसुती वेदना दिल्या नाहीत मी प्रसवलेहि नाही,
मी तरूण पुरूष वाढवले नाहीत तरूणींना लहाण्याच्या मोठ्या केल्या नाहीत.”
5. मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.
6. तार्शीशास पार जा, समुद्रतीरी राहणाऱ्यांनो तुम्ही आकांत करा.
7. अति आनंदी, सुखी वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द नावजलेली होती,
पण आता तीचेच पाय तिला परदेशात घेऊन जात आहेत.
8. मुकुट देणार हे सोर, ज्याचे व्यापारी अधिकारी आहेत, ज्याचे वाणी पृथ्वीतले प्रतिष्ठीत आहेत, त्या विषयी हे कोणी योजीले?
9. सर्व शोभेच्या वैभवाला डाग लावण्यासाठी पृथ्वीतल्या सर्व प्रतिष्ठांना अप्रतिष्ठीत करण्यासाठी सेनाधीश परमेश्वराने हे योजिले आहे.
10. हे तार्शीशच्या कन्ये नील नदीप्रमाणे आपली भूमी नांगर. सोर मध्ये तुला व्यापारी ठिकाण नाही.
11. परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे आणि त्याने राज्ये हालवून टाकली.
त्याने कनानाचे सर्व दुर्ग नष्ट करण्याची आज्ञा दिलेली आहे.
12. तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस,
उठ, सायप्रस पार कर, पण तेथेही तुला आराम मिळणार नाही.”
13. खास्दयांचा * बाबेल देश पाहा तो आता नामशेष आहे, अश्शूर देशातील लोकांनी त्यास ओसाड करण्यासाठी जंगली पशुच्या स्वाधिन केले आहे
त्यांनी त्यांचे बूरूज वेढा देण्यासाठी स्थापले आहेत त्याचे ढीगारे बनवतील, समुद्रावर संचार करणाऱ्यानो रडा शोक करा कारण तुमच्या बंदराचा नाश झाला आहे त्याचा पुर्ण विध्वंस केलेला आहे.
14. तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे. PEPS
15. त्या दिवसात असे घडेल की सर्व जगाला सोराची विस्मृती सतर वर्षेपर्यंत पडेल, सोर प्रदेशाची कोणालाच आठवण राहणार नाही तो पर्यंत एका राजाची कारकिर्द संपेल.
16. हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर,
ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा. PEPS
17. सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल.
18. तिच्या व्यापाराचा माल त्याचे वतन परमेश्वरास पवित्र होईल, ते वतन साठवले जाणार नाही राखून ठेवले जाणार नाही, तर जे परेश्वरासमोर राहतात त्यांनी भरपूर खावे टिकाऊ वस्त्र घालावे म्हणून त्यांच्यासाठी त्याचा व्यापाऱ्याचा माल येईल. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×