Bible Books

:

1. {आहाजाला यशयाचा पहिला संदेश} PS यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही.
2. दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम * इस्राएलच्या उत्तरेकडील राज्य हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली. PEPS
3. मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.
4. त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको. PEPS
5. अराम, एफ्राईम, रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात,
6. आपण यहूदावर चालून जाऊ त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु.
7. प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही,
8. कारण अरामाचे शीर दिमिष्क दिमिष्काचे शीर रसीन आहे.
पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.
9. एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे.
तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.” PS
10. {इम्मानुएलसंबंधी यशयाचा संदेश} PS परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला,
11. “तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.”
12. परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” PEPS
13. मग यशयाने उत्तर दिले, “दावीदाच्या घराण्या, ऐक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले ऐवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय?
14. म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल.
15. तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी मध यांचे सेवन करील. PEPS
16. कारण त्या मुलाला वाईट नाकारून चांगले ते पसंत करावे हे कळू लागण्याआधीच ज्या दोन राजांची तुला धास्ती पडली आहे त्यांची भूमी उजाड होईल.
17. एफ्राईम यहूदापासून वेगळा आला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुझ्यावर, तुझ्या लोकांवर आणि तुझ्या वडिलाच्या घराण्यावर आणील; तो अश्शूरच्या राजाला तुजविरूद्ध आणील.”
18. त्यावेळी
मिसरच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला
अश्शूर देशातील मधमाशीला परमेश्वर शीळ घालून बोलावील.
19. त्या सगळ्या खोऱ्यात खडकाच्या कपारीत
सगळ्या काटेरी झुडपात सर्व कुरणांत तळ देतील. PEPS
20. त्यावेळी प्रभू अश्शूरच्या राजाचा एका भाड्याने घेतलेल्या वस्तऱ्याप्रमाणे उपयोग करून,
तुमच्या डोक्याच्या पायांच्या केसांचा मुंडण करील तो तुमची दाढी देखील तासून काढील.
21. त्या दिवशी मनुष्य एक कालवड दोन मेंढ्या पाळील.
22. आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल,
कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी मध खाईल.
23. त्यावेळी जेथे हजार शेकेल चांदीच्या साधारण 11.5 किलोग्राम नाण्याएवढ्या किंमतीची हजार द्राक्षवेली होत्या,
तेथे तण आणि काटेकुटे याव्यतिरिक्त काहीही राहणार नाही
24. माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण काटेकुटे यांनी भरलेली असते.
25. ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणून शेती करीत त्या सर्वापासून ते काटेरीझुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील,
पण गुरेढोरे मेढ्या तेवढ्या चरण्यासाठी तेथे जातील. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×