Bible Books

:

1. {सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस} PS जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे?
जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे?
जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.
2. तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?
3. “मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता.
मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधाने त्यांना रगडले.
त्यांचे रक्त माझ्या कपड्यांवर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत.
4. कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे.
5. मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले.
परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले.
6. माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.
7. {इस्राएलासंबंधी परमेश्वराचा चांगुलपणा} PS मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन.
परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन.
त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.
8. कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत.
म्हणून तो त्यांचा त्राता झाला.
9. त्यांच्या सर्व दु:खात,
तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले.
त्याने आपल्या प्रेमाने आपल्या करूणेने त्यांना वाचवले,
आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.
10. पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले.
म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरुद्ध लढला.
11. त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला.
ते म्हणाले, तो देव कोठे आहे? ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले,
देव कोठे आहे? ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला
12. ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले,
आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे?
13. तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत.
14. परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला.
ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो.
15. {दया साहाय्य ह्यांसाठी प्रार्थना} PS स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र तेजोमय वस्तीतून नोंद घे.
तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत?
तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत
16. तू तर आमचा पिता आहेस,
तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही.
परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे.
17. परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस?
तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत.
18. तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले.
19. त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×