|
|
1. लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.
|
1. Now G1161 a certain G5100 man was G2258 sick G770 , named Lazarus G2976 , of G575 Bethany G963 , the G3588 town G2968 of Mary G3137 and G2532 her G846 sister G79 Martha G3136 .
|
2. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता.
|
2. ( It G1161 was G2258 that Mary G3137 which anointed G218 the G3588 Lord G2962 with ointment G3464 , and G2532 wiped G1591 his G846 feet G4228 with her G848 hair G2359 , whose G3739 brother G80 Lazarus G2976 was sick G770 .)
|
3. त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.
|
3. Therefore G3767 his sisters G79 sent G649 unto G4314 him G846 , saying G3004 , Lord G2962 , behold G2396 , he whom G3739 thou lovest G5368 is sick G770 .
|
4. पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.”
|
4. When G1161 Jesus G2424 heard G191 that, he said G2036 , This G3778 sickness G769 is G2076 not G3756 unto G4314 death G2288 , but G235 for G5228 the G3588 glory G1391 of God G2316 , that G2443 the G3588 Son G5207 of God G2316 might be glorified G1392 thereby G1223 G846 .
|
5. येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे.
|
5. Now G1161 Jesus G2424 loved G25 Martha G3136 , and G2532 her G846 sister G79 , and G2532 Lazarus G2976 .
|
6. म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला.
|
6. When G5613 he had heard G191 therefore G3767 that G3754 he was sick G770 , he abode G3306 G3303 two G1417 days G2250 still G5119 in G1722 the same G3739 place G5117 where he was G2258 .
|
7. नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”
|
7. Then G1899 after G3326 that G5124 saith G3004 he to his disciples G3101 , Let us go G71 into G1519 Judea G2449 again G3825 .
|
8. शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”
|
8. His disciples G3101 say G3004 unto him G846 , Master G4461 , the G3588 Jews G2453 of late G3568 sought G2212 to stone G3034 thee G4571 ; and G2532 goest G5217 thou thither G1563 again G3825 ?
|
9. येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो.
|
9. Jesus G2424 answered G611 , Are G1526 there not G3780 twelve G1427 hours G5610 in the G3588 day G2250 ? If G1437 any man G5100 walk G4043 in G1722 the G3588 day G2250 , he stumbleth G4350 not G3756 , because G3754 he seeth G991 the G3588 light G5457 of this G5127 world G2889 .
|
10. पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”
|
10. But G1161 if G1437 a man G5100 walk G4043 in G1722 the G3588 night G3571 , he stumbleth G4350 , because G3754 there is G2076 no G3756 light G5457 in G1722 him G846 .
|
11. या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे.”
|
11. These things G5023 said G2036 he: and G2532 after G3326 that G5124 he saith G3004 unto them G846 , Our G2257 friend G5384 Lazarus G2976 sleepeth G2837 ; but G235 I go G4198 , that G2443 I may awake him out of sleep G1852 G846 .
|
12. तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.”
|
12. Then G3767 said G2036 his G846 disciples G3101 , Lord G2962 , if G1487 he sleep G2837 , he shall do well G4982 .
|
13. पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.
|
13. Howbeit G1161 Jesus G2424 spake G2046 of G4012 his G846 death G2288 : but G1161 they G1565 thought G1380 that G3754 he had spoken G3004 of G4012 taking of rest G2838 in sleep G5258 .
|
14. तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे.
|
14. Then G5119 G3767 said G2036 Jesus G2424 unto them G846 plainly G3954 , Lazarus G2976 is dead G599 .
|
15. आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”
|
15. And G2532 I am glad G5463 for your sakes G1223 G5209 that G3754 I was G2252 not G3756 there G1563 , to the intent G2443 ye may believe G4100 ; nevertheless G235 let us go G71 unto G4314 him G846 .
|
16. तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”
|
16. Then G3767 said G2036 Thomas G2381 , which is called G3004 Didymus G1324 , unto his fellow disciples G4827 , Let us G2249 also G2532 go G71 , that G2443 we may die G599 with G3326 him G846 .
|
17. येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे.
|
17. Then G3767 when Jesus G2424 came G2064 , he found G2147 that G846 he had G2192 lain in G1722 the G3588 grave G3419 four G5064 days G2250 already G2235 .
|
18. बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते.
|
18. Now G1161 Bethany G963 was G2258 nigh unto G1451 Jerusalem G2414 , about G5613 fifteen G1178 furlongs G4712 off G575 :
|
19. आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.
|
19. And G2532 many G4183 of G1537 the G3588 Jews G2453 came G2064 to G4314 Martha G3136 and G2532 Mary G3137 , to G2443 comfort G3888 them G846 concerning G4012 their G846 brother G80 .
|
20. जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली.
|
20. Then G3767 Martha G3136 , as soon as G5613 she heard G191 that G3754 Jesus G2424 was coming G2064 , went and met G5221 him G846 : but G1161 Mary G3137 sat G2516 still in G1722 the G3588 house G3624 .
|
21. ‘प्रभु’ मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता,
|
21. Then G3767 said G2036 Martha G3136 unto G4314 Jesus G2424 , Lord G2962 , if G1487 thou hadst been G2258 here G5602 , my G3450 brother G80 had not G3756 died G2348 G302 .
|
22. पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”
|
22. But G235 I know G1492 , that G3754 even G2532 now G3568 , whatsoever G3745 thou wilt ask G154 G302 of God G2316 , God G2316 will give G1325 it thee G4671 .
|
23. येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
|
23. Jesus G2424 saith G3004 unto her G846 , Thy G4675 brother G80 shall rise again G450 .
|
24. मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”
|
24. Martha G3136 saith G3004 unto him G846 , I know G1492 that G3754 he shall rise again G450 in G1722 the G3588 resurrection G386 at G1722 the G3588 last G2078 day G2250 .
|
25. येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.
|
25. Jesus G2424 said G2036 unto her G846 , I G1473 am G1510 the G3588 resurrection G386 , and G2532 the G3588 life G2222 : he that believeth G4100 in G1519 me G1691 , though G2579 he were dead G599 , yet shall he live G2198 :
|
26. आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”
|
26. And G2532 whosoever G3956 liveth G2198 and G2532 believeth G4100 in G1519 me G1691 shall never G3364 G1519 G165 die G599 . Believest G4100 thou this G5124 ?
|
27. ‘होय प्रभु.’ ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस.”
|
27. She saith G3004 unto him G846 , Yea G3483 , Lord G2962 : I G1473 believe G4100 that G3754 thou G4771 art G1488 the G3588 Christ G5547 , the G3588 Son G5207 of God G2316 , which should come G2064 into G1519 the G3588 world G2889 .
|
28. आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.”
|
28. And G2532 when she had so G5023 said G2036 , she went her way G565 , and G2532 called G5455 Mary G3137 her G848 sister G79 secretly G2977 , saying G2036 , The G3588 Master G1320 is come G3918 , and G2532 calleth G5455 for thee G4571 .
|
29. जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली.
|
29. As soon as G5613 she G1565 heard G191 that, she arose G1453 quickly G5035 , and G2532 came G2064 unto G4314 him G846 .
|
30. आता तोपर्थंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता.
|
30. Now G1161 Jesus G2424 was not yet G3768 come G2064 into G1519 the G3588 town G2968 , but G235 was G2258 in G1722 that place G5117 where G3699 Martha G3136 met G5221 him G846 .
|
31. तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले.
|
31. The G3588 Jews G2453 then G3767 which were G5607 with G3326 her G846 in G1722 the G3588 house G3614 , and G2532 comforted G3888 her G846 , when they saw G1492 Mary G3137 , that G3754 she rose up G450 hastily G5030 and G2532 went out G1831 , followed G190 her G846 , saying G3004 , She goeth G5217 unto G1519 the G3588 grave G3419 to G2443 weep G2799 there G1563 .
|
32. मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
|
32. Then G3767 when G5613 Mary G3137 was come G2064 where G3699 Jesus G2424 was G2258 , and saw G1492 him G846 , she fell down G4098 at G1519 his G846 feet G4228 , saying G3004 unto him G846 , Lord G2962 , if G1487 thou hadst been G2258 here G5602 , my G3450 brother G80 had not G3756 died G599 G302 .
|
33. मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला.
|
33. When G5613 Jesus G2424 therefore G3767 saw G1492 her G846 weeping G2799 , and G2532 the G3588 Jews G2453 also weeping G2799 which came with G4905 her G846 , he groaned G1690 in the G3588 spirit G4151 , and G2532 was troubled G5015 G1438 .
|
34. तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”
|
34. And G2532 said G2036 , Where G4226 have ye laid G5087 him? They G846 said G3004 unto him G846 , Lord G2962 , come G2064 and G2532 see G1492 .
|
35. येशू रडला.
|
35. Jesus G2424 wept G1145 .
|
36. तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”
|
36. Then G3767 said G3004 the G3588 Jews G2453 , Behold G2396 how G4459 he loved G5368 him G846 !
|
37. पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”
|
37. And G1161 some G5100 of G1537 them G846 said G2036 , Could G1410 not G3756 this man G3778 , which opened G455 the G3588 eyes G3788 of the G3588 blind G5185 , have caused G4160 that G2443 even G2532 this man G3778 should not G3361 have died G599 ?
|
38. मग येशू पुन्हा अंत:करणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता.
|
38. Jesus G2424 therefore G3767 again G3825 groaning G1690 in G1722 himself G1438 cometh G2064 to G1519 the G3588 grave G3419 . It G1161 was G2258 a cave G4693 , and G2532 a stone G3037 lay G1945 upon G1909 it G846 .
|
39. येशूने म्हटले, “हा दगड काढा.” मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.
|
39. Jesus G2424 said G3004 , Take ye away G142 the G3588 stone G3037 . Martha G3136 , the G3588 sister G79 of him that was dead G2348 , saith G3004 unto him G846 , Lord G2962 , by this time G2235 he stinketh G3605 : for G1063 he hath been G2076 dead four days G5066 .
|
40. येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
|
40. Jesus G2424 saith G3004 unto her G846 , Said G2036 I not G3756 unto thee G4671 , that G3754 , if G1437 thou wouldest believe G4100 , thou shouldest see G3700 the G3588 glory G1391 of God G2316 ?
|
41. मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो.
|
41. Then G3767 they took away G142 the G3588 stone G3037 from the place where G3757 the G3588 dead G2348 was G2258 laid G2749 . And G1161 Jesus G2424 lifted G142 up G507 his eyes G3788 , and G2532 said G2036 , Father G3962 , I thank G2168 thee G4671 that G3754 thou hast heard G191 me G3450 .
|
42. आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठवावा.”
|
42. And G1161 I G1473 knew G1492 that G3754 thou hearest G191 me G3450 always G3842 : but G235 because G1223 of the G3588 people G3793 which stand by G4026 I said G2036 it, that G2443 they may believe G4100 that G3754 thou G4771 hast sent G649 me G3165 .
|
43. असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.”
|
43. And G2532 when he thus G5023 had spoken G2036 , he cried G2905 with a loud G3173 voice G5456 , Lazarus G2976 , come G1204 forth G1854 .
|
44. मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”
|
44. And G2532 he that was dead G2348 came forth G1831 , bound G1210 hand G5495 and G2532 foot G4228 with graveclothes G2750 : and G2532 his G846 face G3799 was bound about G4019 with a napkin G4676 . Jesus G2424 saith G3004 unto them G846 , Loose G3089 him G846 , and G2532 let G863 him go G5217 .
|
45. जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
|
45. Then G3767 many G4183 of G1537 the G3588 Jews G2453 which came G2064 to G4314 Mary G3137 , and G2532 had seen G2300 the things which G3739 Jesus G2424 did G4160 , believed G4100 on G1519 him G846 .
|
46. पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितल.
|
46. But G1161 some G5100 of G1537 them G846 went their ways G565 to G4314 the G3588 Pharisees G5330 , and G2532 told G2036 them G846 what things G3739 Jesus G2424 had done G4160 .
|
47. तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
|
47. Then G3767 gathered G4863 the G3588 chief priests G749 and G2532 the G3588 Pharisees G5330 a council G4892 , and G2532 said G3004 , What G5101 do G4160 we? for G3754 this G3778 man G444 doeth G4160 many G4183 miracles G4592 .
|
48. आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”
|
48. If G1437 we let him thus alone G863 G846 G3779 , all G3956 men will believe G4100 on G1519 him G846 : and G2532 the G3588 Romans G4514 shall come G2064 and G2532 take away G142 both G2532 our G2257 place G5117 and G2532 nation G1484 .
|
49. तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाचो व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही!
|
49. And G1161 G5100 one G1520 of G1537 them G846 , named Caiaphas G2533 , being G5607 the high priest G749 that same G1565 year G1763 , said G2036 unto them G846 , Ye G5210 know G1492 G3756 nothing at all G3762 ,
|
50. तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”
|
50. Nor G3761 consider G1260 that G3754 it is expedient G4851 for us G2254 , that G2443 one G1520 man G444 should die G599 for G5228 the G3588 people G2992 , and G2532 that the G3588 whole G3650 nation G1484 perish G622 not G3361 .
|
51. तो हे स्वत: होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे.
|
51. And G1161 this G5124 spake G2036 he not G3756 of G575 himself G1438 : but G235 being G5607 high priest G749 that G1565 year G1763 , he prophesied G4395 that G3754 Jesus G2424 should G3195 die G599 for G5228 that nation G1484 ;
|
52. केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.
|
52. And G2532 not G3756 for G5228 that nation G1484 only G3440 , but G235 that G2443 also G2532 he should gather together G4863 in G1519 one G1520 the G3588 children G5043 of God G2316 that were scattered abroad G1287 .
|
53. म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली.
|
53. Then G3767 from G575 that G1565 day G2250 forth they took counsel together G4823 for to G2443 put him to death G615 G846 .
|
54. यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.
|
54. Jesus G2424 therefore G3767 walked G4043 no G3756 more G2089 openly G3954 among G1722 the G3588 Jews G2453 ; but G235 went G565 thence G1564 unto G1519 a country G5561 near to G1451 the G3588 wilderness G2048 , into G1519 a city G4172 called G3004 Ephraim G2187 , and there G2546 continued G1304 with G3326 his G846 disciples G3101 .
|
55. तेव्हा यहूघांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले.
|
55. And G1161 the G3588 Jews G2453 ' passover G3957 was G2258 nigh at hand G1451 : and G2532 many G4183 went out of the country up G305 G1537 G3588 G5561 to G1519 Jerusalem G2414 before G4253 the G3588 passover G3957 , to G2443 purify G48 themselves G1438 .
|
56. ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?’
|
56. Then G3767 sought G2212 they for Jesus G2424 , and G2532 spake G3004 among G3326 themselves G240 , as they stood G2476 in G1722 the G3588 temple G2411 , What G5101 think G1380 ye G5213 , that G3754 he will not G3364 come G2064 to G1519 the G3588 feast G1859 ?
|
57. पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.
|
57. Now G1161 both G2532 the G3588 chief priests G749 and G2532 the G3588 Pharisees G5330 had given G1325 a commandment G1785 , that G2443 , if G1437 any man G5100 knew G1097 where G4226 he were G2076 , he should show G3377 it, that G3704 they might take G4084 him G846 .
|