|
|
1. एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.
|
1. And the children H1121 of Israel H3478 again H3254 did H6213 evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 , when Ehud H261 was dead H4191 .
|
2. तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता.
|
2. And the LORD H3068 sold H4376 them into the hand H3027 of Jabin H2985 king H4428 of Canaan H3667 , that H834 reigned H4427 in Hazor H2674 ; the captain H8269 of whose host H6635 was Sisera H5516 , which H1931 dwelt H3427 in Harosheth of the Gentiles H2800 .
|
3. सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.
|
3. And the children H1121 of Israel H3478 cried H6817 unto H413 the LORD H3068 : for H3588 he had nine H8672 hundred H3967 chariots H7393 of iron H1270 ; and twenty H6242 years H8141 he H1931 mightily H2393 oppressed H3905 H853 the children H1121 of Israel H3478 .
|
4. तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती.
|
4. And Deborah H1683 , a prophetess H5031 H802 , the wife H802 of Lapidoth H3941 , she H1931 judged H8199 H853 Israel H3478 at that H1931 time H6256 .
|
5. एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते.
|
5. And she H1931 dwelt H3427 under H8478 the palm tree H8560 of Deborah H1683 between H996 Ramah H7414 and Bethel H1008 in mount H2022 Ephraim H669 : and the children H1121 of Israel H3478 came up H5927 to H413 her for judgment H4941 .
|
6. तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा.
|
6. And she sent H7971 and called H7121 Barak H1301 the son H1121 of Abinoam H42 out of Kedesh H4480 H6943 H5320 -naphtali , and said H559 unto H413 him , Hath not H3808 the LORD H3068 God H430 of Israel H3478 commanded H6680 , saying , Go H1980 and draw H4900 toward mount H2022 Tabor H8396 , and take H3947 with H5973 thee ten H6235 thousand H505 men H376 of the children H4480 H1121 of Naphtali H5321 and of the children H4480 H1121 of Zebulun H2074 ?
|
7. मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.
|
7. And I will draw H4900 unto H413 thee to H413 the river H5158 Kishon H7028 H853 Sisera H5516 , the captain H8269 of Jabin H2985 's army H6635 , with his chariots H7393 and his multitude H1995 ; and I will deliver H5414 him into thine hand H3027 .
|
8. त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”
|
8. And Barak H1301 said H559 unto H413 her, If H518 thou wilt go H1980 with H5973 me , then I will go H1980 : but if H518 thou wilt not H3808 go H1980 with H5973 me, then I will not H3808 go H1980 .
|
9. दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.” आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली.
|
9. And she said H559 , I will surely go H1980 H1980 with H5973 thee: notwithstanding H3808 H57 the journey H1870 that H834 thou H859 takest H1980 shall not H3808 be H1961 for thine honor H8597 ; for H3588 the LORD H3068 shall sell H4376 H853 Sisera H5516 into the hand H3027 of a woman H802 . And Deborah H1683 arose H6965 , and went H1980 with H5973 Barak H1301 to Kedesh H6943 .
|
10. तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.
|
10. And Barak H1301 called H2199 H853 Zebulun H2074 and Naphtali H5321 to Kedesh H6943 ; and he went up H5927 with ten H6235 thousand H505 men H376 at his feet H7272 : and Deborah H1683 went up H5927 with H5973 him.
|
11. हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.
|
11. Now Heber H2268 the Kenite H7014 , which was of the children H4480 H1121 of Hobab H2246 the father H2859 -in-law of Moses H4872 , had severed himself H6504 from the Kenites H4480 H7017 , and pitched H5186 his tent H168 unto H5704 the plain H436 of Zaanaim H6815 , which H834 is by H854 Kedesh H6943 .
|
12. अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले.
|
12. And they showed H5046 Sisera H5516 that H3588 Barak H1301 the son H1121 of Abinoam H42 was gone up H5927 to mount H2022 Tabor H8396 .
|
13. तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.
|
13. And Sisera H5516 gathered together H2199 H853 all H3605 his chariots H7393 , even nine H8672 hundred H3967 chariots H7393 of iron H1270 , and all H3605 the people H5971 that H834 were with H854 him , from Harosheth of the Gentiles H4480 H2800 unto H413 the river H5158 of Kishon H7028 .
|
14. तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला.
|
14. And Deborah H1683 said H559 unto H413 Barak H1301 , Up H6965 ; for H3588 this H2088 is the day H3117 in which H834 the LORD H3068 hath delivered H5414 H853 Sisera H5516 into thine hand H3027 : is not H3808 the LORD H3068 gone out H3318 before H6440 thee? So Barak H1301 went down H3381 from mount H4480 H2022 Tabor H8396 , and ten H6235 thousand H505 men H376 after H310 him.
|
15. त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला.
|
15. And the LORD H3068 discomfited H2000 H853 Sisera H5516 , and all H3605 his chariots H7393 , and all H3605 his host H4264 , with the edge H6310 of the sword H2719 before H6440 Barak H1301 ; so that Sisera H5516 lighted down H3381 off H4480 H5921 his chariot H4818 , and fled away H5127 on his feet H7272 .
|
16. बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
|
16. But Barak H1301 pursued H7291 after H310 the chariots H7393 , and after H310 the host H4264 , unto H5704 Harosheth of the Gentiles H2800 : and all H3605 the host H4264 of Sisera H5516 fell H5307 upon the edge H6310 of the sword H2719 ; and there was not H3808 a man H259 left H7604 .
|
17. पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला.
|
17. Howbeit Sisera H5516 fled away H5127 on his feet H7272 to H413 the tent H168 of Jael H3278 the wife H802 of Heber H2268 the Kenite H7017 : for H3588 there was peace H7965 between H996 Jabin H2985 the king H4428 of Hazor H2674 and the house H1004 of Heber H2268 the Kenite H7017 .
|
18. याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
|
18. And Jael H3278 went out H3318 to meet H7125 Sisera H5516 , and said H559 unto H413 him , Turn in H5493 , my lord H113 , turn in H5493 to H413 me; fear H3372 not H408 . And when he had turned in H5493 unto H413 her into the tent H168 , she covered H3680 him with a mantle H8063 .
|
19. सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.
|
19. And he said H559 unto H413 her , Give me , I pray thee H4994 , a little H4592 water H4325 to drink H8248 ; for H3588 I am thirsty H6770 . And she opened H6605 H853 a bottle H4997 of milk H2461 , and gave him drink H8248 , and covered H3680 him.
|
20. तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि “आत कोणी आहे का?” असे कोणी विचारले तर “नाही” म्हणून सांग.”
|
20. Again he said H559 unto H413 her, Stand H5975 in the door H6607 of the tent H168 , and it shall be H1961 , when H518 any man H376 doth come H935 and inquire H7592 of thee , and say H559 , Is H3426 there any man H376 here H6311 ? that thou shalt say H559 , No H369 .
|
21. मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
|
21. Then Jael H3278 Heber H2268 's wife H802 took H3947 H853 a nail H3489 of the tent H168 , and took H7760 H853 a hammer H4718 in her hand H3027 , and went H935 softly H3814 unto H413 him , and smote H8628 H853 the nail H3489 into his temples H7451 , and fastened H6795 it into the ground H776 : for he H1931 was fast asleep H7290 and weary H5774 . So he died H4191 .
|
22. तेवढचात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.
|
22. And, behold H2009 , as Barak H1301 pursued H7291 H853 Sisera H5516 , Jael H3278 came out H3318 to meet H7125 him , and said H559 unto him, Come H1980 , and I will show H7200 thee H853 the man H376 whom H834 thou H859 seekest H1245 . And when he came H935 into H413 her tent , behold H2009 , Sisera H5516 lay H5307 dead H4191 , and the nail H3489 was in his temples H7451 .
|
23. त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला.
|
23. So God H430 subdued H3665 on that H1931 day H3117 H853 Jabin H2985 the king H4428 of Canaan H3667 before H6440 the children H1121 of Israel H3478 .
|
24. या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्ध्य उत्तरोत्तर वाढत गेले.
|
24. And the hand H3027 of the children H1121 of Israel H3478 prospered H1980 , and prevailed H1980 H7186 against H5921 Jabin H2985 the king H4428 of Canaan H3667 , until H5704 H834 they had destroyed H3772 H853 Jabin H2985 king H4428 of Canaan H3667 .
|