Bible Books

:

1. आमोजचा मुलगा यशया ह्याला पुढीलप्रमाणे देवाचा दृष्टान्त झाला आणि यहूदा यरूशलेम येथे पुढे घडणाऱ्या गोष्टी देवाने यशयाला दाखविल्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया या यहूदी राजांच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी यशयाने पाहिल्या.
1. The vision H2377 of Isaiah H3470 the son H1121 of Amoz H531 , which H834 he saw H2372 concerning H5921 Judah H3063 and Jerusalem H3389 in the days H3117 of Uzziah H5818 , Jotham H3147 , Ahaz H271 , and Hezekiah H3169 , kings H4428 of Judah H3063 .
2. हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. परमेश्वर म्हणतो, “मी माझ्या मुलांचे पालनपोषण केले त्यांना लहानाचे मोठे केले. पण तीच मुले माझ्यावर उलटली.
2. Hear H8085 , O heavens H8064 , and give ear H238 , O earth H776 : for H3588 the LORD H3068 hath spoken H1696 , I have nourished H1431 and brought up H7311 children H1121 , and they H1992 have rebelled H6586 against me.
3. गाय आपल्या मालकाला ओळखते. गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते. पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत. माझ्या लोकांना काही समजत नाही.”
3. The ox H7794 knoweth H3045 his owner H7069 , and the ass H2543 his master H1167 's crib H18 : but Israel H3478 doth not H3808 know H3045 , my people H5971 doth not H3808 consider H995 .
4. इस्राएल हे राष्ट्र पापांनी भरले आहे. अन्याय, दुष्कृत्ये ह्यांचा बोजा त्यांच्यावर पडला आहे. पापी कुटुंबातील दुर्वर्तनी मुलांप्रमाणे इस्राएल लोक वागत आहेत. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आहे. इस्राएलच्या पवित्र देवाचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी त्याचा त्याग केला त्याला एखाद्या परक्या माणसाप्रमाणे वागवले.
4. Ah H1945 sinful H2398 nation H1471 , a people H5971 laden H3515 with iniquity H5771 , a seed H2233 of evildoers H7489 , children H1121 that are corrupters H7843 : they have forsaken H5800 H853 the LORD H3068 , they have provoked H5006 H853 the Holy One H6918 of Israel H3478 unto anger , they are gone away H2114 backward H268 .
5. देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके हृदय कमकुवत झाले आहे.
5. Why H5921 H4100 should ye be stricken H5221 any more H5750 ? ye will revolt H5627 more and more H3254 : the whole H3605 head H7218 is sick H2483 , and the whole H3605 heart H3824 faint H1742 .
6. तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर जखमा, घाव वाहते व्रण आहेत. त्या वाहत्या व्रणीची तुम्ही काळजी घेतली नाही. तुमच्या जखमा तेल सोडून नरम केल्या नाहीत आणि त्यावर पट्टीही बांधली नाही.
6. From the sole H4480 H3709 of the foot H7272 even unto H5704 the head H7218 there is no H369 soundness H4974 in it; but wounds H6482 , and bruises H2250 , and putrefying H2961 sores H4347 : they have not H3808 been closed H2115 , neither H3808 bound up H2280 , neither H3808 mollified H7401 with ointment H8081 .
7. “तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.
7. Your country H776 is desolate H8077 , your cities H5892 are burned H8313 with fire H784 : your land H127 , strangers H2114 devour H398 it in your presence H5048 , and it is desolate H8077 , as overthrown H4114 by strangers H2114 .
8. सीयोनची मुलगी (यरूशलेम) द्राक्षांच्या बागेतील रिकाम्या खोपटाप्रमाणे झाली आहे. तिची अवस्था काकडीच्या शेतातील जुन्या घराप्रमाणे झाली आहे. शत्रूने पराभूत केलेल्या नगराप्रमाणे ती दिसते.”
8. And the daughter H1323 of Zion H6726 is left H3498 as a cottage H5521 in a vineyard H3754 , as a lodge H4412 in a garden of cucumbers H4750 , as a besieged H5341 city H5892 .
9. सर्व शक्तिमान परमेश्वराने काही लोकांना जिवंत ठेवले नसते तर सदोम अथवा गमोरा ह्या शहरांप्रमाणे आपला संपूर्ण नाश झाला असता.
9. Except H3884 the LORD H3068 of hosts H6635 had left H3498 unto us a very small H4592 remnant H8300 , we should have been H1961 as Sodom H5467 , and we should have been like H1819 unto Gomorrah H6017 .
10. सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या.
10. Hear H8085 the word H1697 of the LORD H3068 , ye rulers H7101 of Sodom H5467 ; give ear H238 unto the law H8451 of our God H430 , ye people H5971 of Gomorrah H6017 .
11. देव म्हणतो, “तुम्ही माझ्यापुढे सतत यज्ञबलि का करता? मला तुमच्या मेंढ्यांच्या, वासरांच्या चरबीच्या, आणि बैल, कोकरे आणि बकऱ्यांच्या यज्ञबलिंचा आता वीट आला आहे.
11. To what H4100 purpose is the multitude H7230 of your sacrifices H2077 unto me? saith H559 the LORD H3068 : I am full H7646 of the burnt offerings H5930 of rams H352 , and the fat H2459 of fed beasts H4806 ; and I delight H2654 not H3808 in the blood H1818 of bullocks H6499 , or of lambs H3532 , or of he goats H6260 .
12. तुम्ही माझ्या दर्शनाला येता तेव्हा माझ्या अंगणातील प्रत्येक गोष्ट तुडविता. असे करायला तुम्हाला कोणी सांगितले?
12. When H3588 ye come H935 to appear H7200 before H6440 me, who H4310 hath required H1245 this H2063 at your hand H4480 H3027 , to tread H7429 my courts H2691 ?
13. “माझ्यासाठी निरर्थक यज्ञबलि देणे थांबवा. माझ्यापुढे जळणाऱ्या धुपाचा मला वीट आला आहे. चंद्रदर्शन शब्बाथ सुटी यांच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या मला आवडत नाहीत. धार्मिक सभेत तुम्ही करीत असलेली दुष्कृत्ये मला अजिबात पसंत नाहीत.
13. Bring H935 no H3808 more H3254 vain H7723 oblations H4503 ; incense H7004 is an abomination H8441 unto me ; the new moons H2320 and sabbaths H7676 , the calling H7121 of assemblies H4744 , I cannot H3808 H3201 away with; it is iniquity H205 , even the solemn meeting H6116 .
14. तुमच्या मासिक सभा मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.
14. Your new moons H2320 and your appointed feasts H4150 my soul H5315 hateth H8130 : they are H1961 a trouble H2960 unto me H5921 ; I am weary H3811 to bear H5375 them .
15. “प्रार्थना करण्यासाठी उचललेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी ऐकणार नाही. का? कारण तुमचे हातरक्ताने माखले आहेत.
15. And when ye spread forth H6566 your hands H3709 , I will hide H5956 mine eyes H5869 from H4480 you: yea H1571 , when H3588 ye make many H7235 prayers H8605 , I will not H369 hear H8085 : your hands H3027 are full H4390 of blood H1818 .
16. “शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका.
16. Wash H7364 you , make you clean H2135 ; put away H5493 the evil H7455 of your doings H4611 from before H4480 H5048 mine eyes H5869 ; cease H2308 to do evil H7489 ;
17. चांगल्या गोष्टी करायला शिका. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. जे दुसऱ्यांना क्लेष देतात त्यांना शासन करा. अनाथ मुलांना मदत करा. विधवांना साहाय्य करा.”
17. Learn H3925 to do well H3190 ; seek H1875 judgment H4941 , relieve H833 the oppressed H2541 , judge H8199 the fatherless H3490 , plead H7378 for the widow H490 .
18. परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.
18. Come H1980 now H4994 , and let us reason together H3198 , saith H559 the LORD H3068 : though H518 your sins H2399 be H1961 as scarlet H8144 , they shall be as white H3835 as snow H7950 ; though H518 they be red H119 like crimson H8438 , they shall be H1961 as wool H6785 .
19. “तुम्ही माझे म्हणणे ऐकाल तर ह्या देशातील चांगल्या वस्तू तुम्हाल प्राप्त होतील.
19. If H518 ye be willing H14 and obedient H8085 , ye shall eat H398 the good H2898 of the land H776 :
20. माझे म्हणणे ऐकणे हे माझ्याविरूध्द जाण्यासारखे होईल आणि शत्रू तुमचा नाश करेल.” स्वत: परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या.
20. But if H518 ye refuse H3985 and rebel H4784 , ye shall be devoured H398 with the sword H2719 : for H3588 the mouth H6310 of the LORD H3068 hath spoken H1696 it .
21. देव म्हणतो, “यरूशलेमेकडे पाहा. ही नगरी माझ्यावर श्रध्दा ठेवणारी आणि माझ्या मताप्रमाणे वागणारी होती. आताच तिला असे वारांगनेप्रमाणे वागायला काय झाले? आता ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. यरूशलेमला प्रामणिक बनवली पाहिजे. यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे राहिले पाहिजे. पण सध्या तेथे खुनी लोक राहतात.
21. How H349 is the faithful H539 city H7151 become H1961 a harlot H2181 ! it was full H4392 of judgment H4941 ; righteousness H6664 lodged H3885 in it ; but now H6258 murderers H7523 .
22. “चांगुलपणा हा चांदीसारखा असतो. पण तुझ्या चांदीला काहीही मोल राहिलेले नाही. तुझ्या द्राक्षरसात (चांगुलपणात) पाणी मिसळल्याने तो पातळ झाला आहे.
22. Thy silver H3701 is become H1961 dross H5509 , thy wine H5435 mixed H4107 with water H4325 :
23. तुझे सत्ताधीश बंडखोर चोरांचे साथीदार झाले आहेत. तुझे सगळे सत्ताधीश लाच मागतात. चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते पैसे घेतात. लोकांना फसविण्यासाठी ते पगार घेतात. ते अनाथ मुलांना मदत करीत नाहीत आणि विधवांच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत.”
23. Thy princes H8269 are rebellious H5637 , and companions H2270 of thieves H1590 : every one H3605 loveth H157 gifts H7810 , and followeth after H7291 rewards H8021 : they judge H8199 not H3808 the fatherless H3490 , neither H3808 doth the cause H7379 of the widow H490 come H935 unto H413 them.
24. यामुळे प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा सामर्थ्यवान ईश्वर म्हणतो, “माझ्या शत्रूंनो, मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही मला जास्त त्रास देऊ शकणार नाही.
24. Therefore H3651 saith H5002 the Lord H113 , the LORD H3068 of hosts H6635 , the mighty One H46 of Israel H3478 , Ah H1945 , I will ease H5162 me of mine adversaries H4480 H6862 , and avenge H5358 me of mine enemies H4480 H341 :
25. चांदी स्वच्छ करण्यासाठी लोक एक रसायन वापरतात. मी तसेच करीन आणि तुझी दुष्कृते धुवून काढीन. मी तुझ्यातील सर्व निरर्थक गोष्टी काढून टाकीन.
25. And I will turn H7725 my hand H3027 upon H5921 thee , and purely H1252 purge away H6884 thy dross H5509 , and take away H5493 all H3605 thy tin H913 :
26. सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली निष्ठावंत नगरी म्हणतील.”‘
26. And I will restore H7725 thy judges H8199 as at the first H7223 , and thy counselors H3289 as at the beginning H8462 : afterward H310 H3651 thou shalt be called H7121 , The city H5892 of righteousness H6664 , the faithful H539 city H7151 .
27. देव कल्याण करणारा आहे आणि तो योग्य त्याच गोष्टी करतो. म्हणूनच सीयोनचा जे त्याला शरण येतील अशा लोकांचा, देव उध्दार करेल.
27. Zion H6726 shall be redeemed H6299 with judgment H4941 , and her converts H7725 with righteousness H6666 .
28. पण सर्व गुन्हेगारांचा आणि पापी लोकांचा नाश होईल. (हे लोक परमेश्वराचे ऐकणारे नाहीत.)
28. And the destruction H7667 of the transgressors H6586 and of the sinners H2400 shall be together H3162 , and they that forsake H5800 the LORD H3068 shall be consumed H3615 .
29. भविष्यात, ज्या ओकच्या झाडांची लोक पूजा करतात ज्या खास बागांमध्ये जाऊन मूर्तींची पूजा करतात, त्या झाडांची बागांची लोकांना लाज वाटेल.
29. For H3588 they shall be ashamed H954 of the oaks H4480 H352 which H834 ye have desired H2530 , and ye shall be confounded H2659 for the gardens H4480 H1593 that H834 ye have chosen H977 .
30. असे होण्याचे कारण तुम्ही त्या पाने गळून जाणाऱ्या ओकच्या झाडांप्रमाणे किंवा पाणी नसल्याने सुकत चाललेल्या बागांप्रमाणे व्हाल.
30. For H3588 ye shall be H1961 as an oak H424 whose leaf H5929 fadeth H5034 , and as a garden H1593 that H834 hath no H369 water H4325 .
31. बलाढ्य माणसे लहानशा वाळलेल्या लाकडाच्या ढलपीप्रमाणे होतील. त्यांची कर्मे आग लावणाऱ्या ठिणगीसारखी असतील. ती बलाढ्य माणसे त्यांची कर्मे ह्यांना एकदमच आग लागेल आणि ती आग कोणीही विझवू शकणार नाहीत.
31. And the strong H2634 shall be H1961 as tow H5296 , and the maker H6467 of it as a spark H5213 , and they shall both H8147 burn H1197 together H3162 , and none H369 shall quench H3518 them .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×