|
|
1. नंतर ईयोबने उत्तर दिले:
|
1. But Job H347 answered H6030 and said H559 ,
|
2. “मी काय म्हणतो ते ऐक. माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.
|
2. Hear diligently H8085 H8085 my speech H4405 , and let this H2063 be H1961 your consolations H8575 .
|
3. मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर. माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
|
3. Suffer H5375 me that I H595 may speak H1696 ; and after that H310 I have spoken H1696 , mock on H3932 .
|
4. “मी लोकांविरुध्द तक्रार करीत नाही. मी अधीर झालो आहे त्याला काही कारण आहे.
|
4. As for me H595 , is my complaint H7879 to man H120 ? and if H518 it were so , why H4069 should not H3808 my spirit H7307 be troubled H7114 ?
|
5. माझ्याकडे बघितल्यावर तुला धक्का बसेल. तुझे हात तोंडावर ठेव आणि माझ्याकडे अचंब्याने बघत रहा.
|
5. Mark H6437 H413 me , and be astonished H8074 , and lay H7760 your hand H3027 upon H5921 your mouth H6310 .
|
6. माझ्यावर आलेल्या प्रसंगांचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
|
6. Even when H518 I remember H2142 I am afraid H926 , and trembling H6427 taketh hold H270 on my flesh H1320 .
|
7. दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
|
7. Wherefore H4069 do the wicked H7563 live H2421 , become old H6275 , yea H1571 , are mighty H1396 in power H2428 ?
|
8. दुष्ट माणसे आपली मुले बाळे मोठी होत असलेली बघतात. आपली नातवंडे बघायला ती जिवंत राहतात.
|
8. Their seed H2233 is established H3559 in their sight H6440 with H5973 them , and their offspring H6631 before their eyes H5869 .
|
9. त्यांची घरे सुरक्षित असतात आणि त्यांना भय नसते. दुष्टांना शिक्षा करण्यासाठी देव आपली छडी वापरीत नाही.
|
9. Their houses H1004 are safe H7965 from fear H4480 H6343 , neither H3808 is the rod H7626 of God H433 upon H5921 them.
|
10. त्यांचे बैल प्रजोत्पादनात असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि वासरे जन्मत:च मृत्युमुखी पडत नाहीत.
|
10. Their bull H7794 engendereth H5674 , and faileth H1602 not H3808 ; their cow H6510 calveth H6403 , and casteth not her calf H7921 H3808 .
|
11. दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
|
11. They send forth H7971 their little ones H5759 like a flock H6629 , and their children H3206 dance H7540 .
|
12. ते तंतुवाद्याच्या आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि नाचतात.
|
12. They take H5375 the timbrel H8596 and harp H3658 , and rejoice H8055 at the sound H6963 of the organ H5748 .
|
13. दुष्ट लोक त्यांच्या आयुष्यात यशाचे सुख अनुभवतात. नंतर ते मरतात आणि दु:खी न होता थडग्यात जातात.
|
13. They spend H3615 their days H3117 in wealth H2896 , and in a moment H7281 go down H5181 to the grave H7585 .
|
14. परंतु दुष्ट लोक ‘आम्हाला एकटे सोड. तू आम्हाला जे करायला सांगतोस त्याची आम्हाला पर्वा नाही’ असे देवाला सांगतात.
|
14. Therefore they say H559 unto God H410 , Depart H5493 from H4480 us ; for we desire H2654 not H3808 the knowledge H1847 of thy ways H1870 .
|
15. आणि दुष्ट लोक म्हणतात, ‘सर्वशक्तिमान देव कोण आहे? आम्हाला त्याची चाकरी करण्याची गरज नाही. त्याची प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही.’
|
15. What H4100 is the Almighty H7706 , that H3588 we should serve H5647 him? and what H4100 profit H3276 should we have, if H3588 we pray H6293 unto him?
|
16. “दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
|
16. Lo H2005 , their good H2898 is not H3808 in their hand H3027 : the counsel H6098 of the wicked H7563 is far H7368 from H4480 me.
|
17. परंतु देव दुष्ट माणसांचा प्रकाश किती वेळा मालवू शकतो? किती वेळा त्यांच्यावर संकटे कोसळतात? देव त्यांच्यावर रागावून त्यांना शिक्षा करतो का?
|
17. How oft H4100 is the candle H5216 of the wicked H7563 put out H1846 ! and how oft cometh H935 their destruction H343 upon H5921 them! God distributeth H2505 sorrows H2256 in his anger H639 .
|
18. देव दुष्ट लोकांना वाऱ्यावर गवत किंवा धान्याची टरफले उडवून देतो का?
|
18. They are H1961 as stubble H8401 before H6440 the wind H7307 , and as chaff H4671 that the storm H5492 carrieth away H1589 .
|
19. पण तू म्हणतोस ‘देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो.’ नाही देवाने दुष्टालाच शिक्षा करायला हवी. तेव्हाच त्या दुष्टाला कळेल की त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळत आहे.
|
19. God H433 layeth up H6845 his iniquity H205 for his children H1121 : he rewardeth H7999 H413 him , and he shall know H3045 it .
|
20. पापी माणसाला शिक्षा भोगू दे. त्याला सर्वशक्तिमान देवाच्या रागाचा अनुभव घेऊ दे.
|
20. His eyes H5869 shall see H7200 his destruction H3589 , and he shall drink H8354 of the wrath H4480 H2534 of the Almighty H7706 .
|
21. दुष्टाचे आयुष्य संपल्यावर तो मरतो. तो मागे राहिलेल्या कुटुंबाची पर्वा करीत नाही.
|
21. For H3588 what H4100 pleasure H2656 hath he in his house H1004 after H310 him , when the number H4557 of his months H2320 is cut off in the midst H2686 ?
|
22. “देवाला कुणीही ज्ञान शिकवू शकत नाही. देव मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
|
22. Shall any teach H3925 God H410 knowledge H1847 ? seeing he H1931 judgeth H8199 those that are high H7311 .
|
23. एखादा माणूस संपूर्ण आणि यशस्वी जीवन जगल्यानंतर मरतो. त्याने अत्यंत सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगलेले असते.
|
23. One H2088 dieth H4191 in his full H8537 strength H6106 , being wholly H3605 at ease H7946 and quiet H7961 .
|
24. त्याचे शरीर चांगले पोसलेले होते आणि त्याची हाडे मजबूत होती.
|
24. His breasts H5845 are full H4390 of milk H2461 , and his bones H6106 are moistened H8248 with marrow H4221 .
|
25. परंतु दुसरा माणूस अत्यंत हालाखीचे जीवन जगतो व मरतो. त्यांचे अंत:करण कडवट झालेले असते. त्याने काहीही चांगले भोगलेले नसते.
|
25. And another H2088 dieth H4191 in the bitterness H4751 of his soul H5315 , and never H3808 eateth H398 with pleasure H2896 .
|
26. शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
|
26. They shall lie down H7901 alike H3162 in H5921 the dust H6083 , and the worms H7415 shall cover H3680 H5921 them.
|
27. “पण तू कसला विचार करीत आहेस ते मला माहीत आहे. कोणत्या डावपेचांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
|
27. Behold H2005 , I know H3045 your thoughts H4284 , and the devices H4209 which ye wrongfully imagine H2554 against H5921 me.
|
28. तू कदाचित् म्हणशील ‘मला चांगल्या माणसाचे घर दाखव. आता मला दुष्ट माणसे कोठे राहतात ते दाखव.’
|
28. For H3588 ye say H559 , Where H346 is the house H1004 of the prince H5081 ? and where H346 are the dwelling H4908 places H168 of the wicked H7563 ?
|
29. “तू प्रवाशांबरोबरच बोलला असशील आणि तू त्यांच्याच गोष्टी खऱ्या धरुन चालशील.
|
29. Have ye not H3808 asked H7592 them that go H5674 by the way H1870 ? and do ye not H3808 know H5234 their tokens H226 ,
|
30. संकटे कोसळतात तेव्हा दुष्ट माणसे त्यातून वाचतात. देवाच्या क्रोधातून ते सहीसलामत सुटतात.
|
30. That H3588 the wicked H7451 is reserved H2820 to the day H3117 of destruction H343 ? they shall be brought forth H2986 to the day H3117 of wrath H5678 .
|
31. दुष्टांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना कुणी शिक्षा करत नाही. त्यांच्या तोंडावर कुणी त्याबद्दल टीका करीत नाही.
|
31. Who H4310 shall declare H5046 his way H1870 to H5921 his face H6440 ? and who H4310 shall repay H7999 him what he H1931 hath done H6213 ?
|
32. दुष्ट माणूस स्मशानात गेल्यावर तेथील रक्षक त्याच्या थडग्याची देखभाल करतो.
|
32. Yet shall he H1931 be brought H2986 to the grave H6913 , and shall remain H8245 in H5921 the tomb H1430 .
|
33. म्हणून दरीतली माती देखील दुष्ट माणसाठी सुखावह असेल. व त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील होतील.
|
33. The clods H7263 of the valley H5158 shall be sweet H4985 unto him , and every H3605 man H120 shall draw H4900 after H310 him , as there are innumerable H369 H4557 before H6440 him.
|
34. “म्हणून तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन करु शकणार नाही. तुमची उत्तरे माझ्या उपयोगाची नाहीत.”
|
34. How H349 then comfort H5162 ye me in vain H1892 , seeing in your answers H8666 there remaineth H7604 falsehood H4604 ?
|