|
|
1. ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे. त्या सर्व गोष्टी मला समजतात.
|
1. Lo H2005 , mine eye H5869 hath seen H7200 all H3605 this , mine ear H241 hath heard H8085 and understood H995 it.
|
2. तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे. मी तुझ्या इतकाच हुशार आहे.
|
2. What ye know H1847 , the same do I H589 know H3045 also H1571 : I H595 am not H3808 inferior H5307 unto H4480 you.
|
3. परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे. मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे.
|
3. Surely H199 I H589 would speak H1696 to H413 the Almighty H7706 , and I desire H2654 to reason H3198 with H413 God H410 .
|
4. तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
|
4. But H199 ye H859 are forgers H2950 of lies H8267 , ye are all H3605 physicians H7495 of no value H457 .
|
5. तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.
|
5. O that H4130 ye would H5414 altogether hold your peace H2790 H2790 ! and it should be H1961 your wisdom H2451 .
|
6. “आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका.
|
6. Hear H8085 now H4994 my reasoning H8433 , and hearken H7181 to the pleadings H7379 of my lips H8193 .
|
7. तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? तुमचे खोटे बोलणे देवाच्या इच्छेनुसार आहे असे तुम्हाला वाटते का?
|
7. Will ye speak H1696 wickedly H5766 for God H410 ? and talk H1696 deceitfully H7423 for him?
|
8. तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात.
|
8. Will ye accept H5375 his person H6440 ? will ye contend H7378 for God H410 ?
|
9. जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्याला काही तरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का?
|
9. Is it good H2896 that H3588 he should search you out H2713 H853 ? or H518 as one man H582 mocketh H2048 another , do ye so mock H2048 him?
|
10. तुम्ही जर एखादा माणूस महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हाला माहीत आहे.
|
10. He will surely reprove H3198 H3198 you, if H518 ye do secretly H5643 accept H5375 persons H6440 .
|
11. देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते. तुम्ही त्याला भीता.
|
11. Shall not H3808 his excellency H7613 make you afraid H1204 ? and his dread H6343 fall H5307 upon H5921 you?
|
12. तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत.
|
12. Your remembrances H2146 are like H4912 unto ashes H665 , your bodies H1354 to bodies H1354 of clay H2563 .
|
13. “आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
|
13. Hold your peace H2790 , let me alone H4480 , that I H589 may speak H1696 , and let come H5674 on H5921 me what H4100 will .
|
14. मी मलाच संकटात लोटीन आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन?
|
14. Wherefore H5921 H4100 do I take H5375 my flesh H1320 in my teeth H8127 , and put H7760 my life H5315 in mine hand H3709 ?
|
15. देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन. पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
|
15. Though H2005 he slay H6991 me , yet will I trust H3176 in him: but H389 I will maintain H3198 mine own ways H1870 before H413 H6440 him.
|
16. आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल. पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.
|
16. He H1931 also H1571 shall be my salvation H3444 : for H3588 a hypocrite H2611 shall not H3808 come H935 before H6440 him.
|
17. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या.
|
17. Hear diligently H8085 H8085 my speech H4405 , and my declaration H262 with your ears H241 .
|
18. मी आता माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन.
|
18. Behold H2009 now H4994 , I have ordered H6186 my cause H4941 ; I know H3045 that H3588 I H589 shall be justified H6663 .
|
19. माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले तर मी गप्प बसेन.
|
19. Who H4310 is he H1931 that will plead H7378 with H5978 me? for H3588 now H6258 , if I hold my tongue H2790 , I shall give up the ghost H1478 .
|
20. “देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे, मग मी तुझ्यापासून लपणार नाही.
|
20. Only H389 do H6213 not H408 two H8147 things unto H5978 me: then H227 will I not H3808 hide myself H5641 from H4480 H6440 thee.
|
21. मला शिक्षा देणे बंद कर आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
|
21. Withdraw H7368 thine hand H3709 far from H4480 H5921 me : and let not H408 thy dread H367 make me afraid H1204 .
|
22. नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
|
22. Then call H7121 thou , and I H595 will answer H6030 : or H176 let me speak H1696 , and answer H7725 thou me.
|
23. मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव.
|
23. How H4100 many are mine iniquities H5771 and sins H2403 ? make me to know H3045 my transgression H6588 and my sin H2403 .
|
24. देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?
|
24. Wherefore H4100 hidest H5641 thou thy face H6440 , and holdest H2803 me for thine enemy H341 ?
|
25. 2तू मला घाबरवतो आाहेस का? मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस.
|
25. Wilt thou break H6206 a leaf H5929 driven to and fro H5086 ? and wilt thou pursue H7291 the dry H3002 stubble H7179 ?
|
26. देवा, तू माझ्याबद्दल फार कटू बोलतोस. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस का?
|
26. For H3588 thou writest H3789 bitter things H4846 against H5921 me , and makest me to possess H3423 the iniquities H5771 of my youth H5271 .
|
27. तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.
|
27. Thou puttest H7760 my feet H7272 also in the stocks H5465 , and lookest narrowly H8104 unto all H3605 my paths H734 ; thou settest a print H2707 upon H5921 the heels H8328 of my feet H7272 .
|
28. म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे”
|
28. And he H1931 , as a rotten thing H7538 , consumeth H1086 , as a garment H899 that is moth H6211 eaten H398 .
|