|
|
1. याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले.
|
1. Thus the heavens H8064 and the earth H776 were finished H3615 , and all H3605 the host H6635 of them.
|
2. देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला.
|
2. And on the seventh H7637 day H3117 God H430 ended H3615 his work H4399 which H834 he had made H6213 ; and he rested H7673 on the seventh H7637 day H3117 from all H4480 H3605 his work H4399 which H834 he had made H6213 .
|
3. देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.
|
3. And God H430 blessed H1288 H853 the seventh H7637 day H3117 , and sanctified H6942 it: because H3588 that in it he had rested H7673 from all H4480 H3605 his work H4399 which H834 God H430 created H1254 and made H6213 .
|
4. हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे.
|
4. These H428 are the generations H8435 of the heavens H8064 and of the earth H776 when they were created H1254 , in the day H3117 that the LORD H3068 God H430 made H6213 the earth H776 and the heavens H8064 ,
|
5. त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
|
5. And every H3605 plant H7880 of the field H7704 before H2962 it was H1961 in the earth H776 , and every H3605 herb H6212 of the field H7704 before H2962 it grew H6779 : for H3588 the LORD H3068 God H430 had not H3808 caused it to rain H4305 upon H5921 the earth H776 , and there was not H369 a man H120 to till H5647 H853 the ground H127 .
|
6. पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे.
|
6. But there went up H5927 a mist H108 from H4480 the earth H776 , and watered H8248 H853 the whole H3605 face H6440 of the ground H127 .
|
7. नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.
|
7. And the LORD H3068 God H430 formed H3335 H853 man H120 of the dust H6083 of H4480 the ground H127 , and breathed H5301 into his nostrils H639 the breath H5397 of life H2416 ; and man H120 became H1961 a living H2416 soul H5315 .
|
8. मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले.
|
8. And the LORD H3068 God H430 planted H5193 a garden H1588 eastward H4480 H6924 in Eden H5731 ; and there H8033 he put H7760 H853 the man H120 whom H834 he had formed H3335 .
|
9. परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली.
|
9. And out of H4480 the ground H127 made the LORD H3068 God H430 to grow H6779 every H3605 tree H6086 that is pleasant H2530 to the sight H4758 , and good H2896 for food H3978 ; the tree H6086 of life H2416 also in the midst H8432 of the garden H1588 , and the tree H6086 of knowledge H1847 of good H2896 and evil H7451 .
|
10. एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या.
|
10. And a river H5104 went out H3318 of Eden H4480 H5731 to water H8248 H853 the garden H1588 ; and from thence H4480 H8033 it was parted H6504 , and became H1961 into four H702 heads H7218 .
|
11. पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते
|
11. The name H8034 of the first H259 is Pison H6376 : that is it H1931 which compasseth H5437 H853 the whole H3605 land H776 of Havilah H2341 , where H834 H8033 there is gold H2091 ;
|
12. त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात
|
12. And the gold H2091 of that H1931 land H776 is good H2896 : there H8033 is bdellium H916 and the onyx H7718 stone H68 .
|
13. दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते.
|
13. And the name H8034 of the second H8145 river H5104 is Gihon H1521 : the same H1931 is it that compasseth H5437 H853 the whole H3605 land H776 of Ethiopia H3568 .
|
14. तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे.
|
14. And the name H8034 of the third H7992 river H5104 is Hiddekel H2313 : that is it H1931 which goeth H1980 toward the east H6926 of Assyria H804 . And the fourth H7243 river H5104 is Euphrates H6578 .
|
15. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले.
|
15. And the LORD H3068 God H430 took H3947 H853 the man H120 , and put H5117 him into the garden H1588 of Eden H5731 to dress H5647 it and to keep H8104 it.
|
16. परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो.
|
16. And the LORD H3068 God H430 commanded H6680 H5921 the man H120 , saying H559 , Of every H4480 H3605 tree H6086 of the garden H1588 thou mayest freely eat H398 H398 :
|
17. परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”
|
17. But of the tree H4480 H6086 of the knowledge H1847 of good H2896 and evil H7451 , thou shalt not H3808 eat H398 of H4480 it: for H3588 in the day H3117 that thou eatest H398 thereof H4480 thou shalt surely die H4191 H4191 .
|
18. नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.”
|
18. And the LORD H3068 God H430 said H559 , It is not H3808 good H2896 that the man H120 should be H1961 alone H905 ; I will make H6213 him a help H5828 meet for him H5048 .
|
19. परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली.
|
19. And out of H4480 the ground H127 the LORD H3068 God H430 formed H3335 every H3605 beast H2416 of the field H7704 , and every H3605 fowl H5775 of the air H8064 ; and brought H935 them unto H413 Adam H121 to see H7200 what H4100 he would call H7121 them : and whatsoever H3605 H834 Adam H121 called H7121 every living H2416 creature H5315 , that H1931 was the name H8034 thereof.
|
20. आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही.
|
20. And Adam H121 gave H7121 names H8034 to all H3605 cattle H929 , and to the fowl H5775 of the air H8064 , and to every H3605 beast H2416 of the field H7704 ; but for Adam H121 there was not H3808 found H4672 a help H5828 meet for him H5048 .
|
21. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.
|
21. And the LORD H3068 God H430 caused a deep sleep H8639 to fall H5307 upon H5921 Adam H121 , and he slept H3462 : and he took H3947 one H259 of his ribs H4480 H6763 , and closed up H5462 the flesh H1320 instead H8478 thereof;
|
22. परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले.
|
22. And H853 the rib H6763 , which H834 the LORD H3068 God H430 had taken H3947 from H4480 man H120 , made H1129 he a woman H802 , and brought H935 her unto H413 the man H120 .
|
23. 2तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
|
23. And Adam H121 said H559 , This H2063 is now H6471 bone H6106 of my bones H4480 H6106 , and flesh H1320 of my flesh H4480 H1320 : she H2063 shall be called H7121 Woman H802 , because H3588 she H2063 was taken H3947 out of Man H4480 H376 .
|
24. म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
|
24. Therefore H5921 H3651 shall a man H376 leave H5800 H853 his father H1 and his mother H517 , and shall cleave H1692 unto his wife H802 : and they shall be H1961 one H259 flesh H1320 .
|
25. एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
|
25. And they were H1961 both H8147 naked H6174 , the man H120 and his wife H802 , and were not H3808 ashamed H954 .
|