Bible Versions
Bible Books

2 Chronicles 15 (MRV) Marathi Old BSI Version

1 ओबेदचा मुलगा अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.
2 2 अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामिन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हाला भेटेल. पण तुम्ही त्याला सोडलेत तर तो ही तुम्हाला सोडेल.
3 3 इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते
4 4 पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा परमेश्वर देवाकडे वळाले, तो इस्राएलचा देव आहे. त्यांनी देवाचा सोध घेतला आणि त्यांना तो सापडला.
5 5 त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.
6 6 देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटांनी त्यांना त्रस्त केले होते.
7 7 पण आसा, तू इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदांनो बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हाला मिळेल.”
8 8 आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.
9 9 मग त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदांत आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर याची त्याला साथ आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.
10 10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले.
11 11 त्यांनी 700 गुरे, 7,000 मेंढरे यांचे बली परमेश्वराला अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती.
12 12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
13 13 जो परमेश्वर देवाची सेवा करणार नाही त्याला ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
14 14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला.
15 15 मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांना मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वराला शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूंनी स्वास्थ्य दिले.
16 16 आसा राजाने आपली आई माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या स्तंभाची स्थापना केली होती. त्याने तो स्तंभ मोडून तोडून टाकला आणि किद्रोन खोऱ्यात जाळून टाकला.
17 17 यहूदातील उच्च स्थाने काढून टाकली नाहीत तरी पण तो आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
18 18 मग त्याने त्याच्या वडलांनी परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.
19 19 आसाच्या पस्तिस वर्षांच्या कारकीर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही. 19
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×