Bible Versions
Bible Books

Genesis 9 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवाने नोहाला त्याच्या मुलांना
2 2 शीर्वाद दिला. तो त्यांना म्हणाला, “पुष्कळ मुलांबाळांना जन्म द्या; आणि तुमच्या संततीने पृथ्वी भरुन टाका. 2पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे, तुमचे भय धरतील; ते सर्व तुमच्या सत्तेखाली असतील.
3 3 ह्या आधी मी तुम्हाला, खाण्याकरिता हिरव्या वनस्पती दिल्या; आता सर्व प्राणीही तुमचे अन्न होतील. मी पृध्वीवरील सर्व काही तुमच्या हाती देतो. ते सर्व तुमचे आहे.
4 4 पण मी तुम्हांस एक आज्ञा देतो की रक्तासकट मांस तुम्ही खाऊ नका कारण रक्त हे त्याचे जीवन आहे;
5 5 तसेच मी तुमच्या जीवाबद्दल रक्ताची मागणी करीन म्हणजे माणसाला ठार मारणाऱ्या कोणत्याहीं पशूच्या जीवाची मी मागाणी करीन आणि माणसाचा जीव घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाची मी मागणी करीन.
6 6 “देवाने माणूस आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्न केला आहे. म्हणून जर एखादी व्यक्ति एखाद्या व्यक्तिद्वारे ठार मारली गेली तर ती व्यक्तिपण त्याच व्यक्तिद्वारेच ठार केली जाईल.
7 7 “नोहा, तू तुझी मुले तुम्हाला भरपूर संतती होवो तुमच्या लोकांद्वारे पृथ्वी भरली जावो.”
8 8 मग देव नोहाला त्याच्या मुलांना म्हणाला,
9 9 “मी आता तुम्हाशी तुमच्या मागे तुमच्या संततीशी एक करार करतो;
10 10 तसेच तुमच्या सोबत जे पक्षी, गुरेढोरे, पशू आणि इतर जे प्राणी तारवातून बाहेर आले त्यांच्याशीही एक करार करतो म्हणजे सर्व सजीव सृष्टीशी मी करार करतो;
11 11 तो करार असा: पृथ्वीवरील सर्वप्राणीमात्र जलप्रलयामुळे नष्ट झाले पण येथून पुढे तसे कधीच होणार नाही, सर्व सजीव सृष्टीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी येणार नाहीं.”
12 12 आणि देव म्हणाला, “मी तुम्हाशी हा करार केल्याची काही तरी खूण तुम्हाला देतो त्या खुणेवरुन (पुराव्यावरुन) मी तुम्हाशी सर्व सजीव सृष्टीशी करार केल्याचे दिसेल. हा करार पिढ्यानपिढ्या युगानुयुग कायम राहील.
13 13 मी ढगात साप्तरंगी धनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी माझ्यामध्ये केलेल्या कराराचा पुरावा म्हणून राहील.
14 14 मी जेव्हा पृथ्वीवरील ढग आणेल तेव्हा तुम्हाला ढगात सप्तरंगी धनुष्य दिसेल
15 15 जेव्हा मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, ह्या कराराप्रमाणे जलप्रलय पृथ्वीवरील जीवनांचा पुन्हा कधीही नाश करणार नाही.
16 16 आणि ते धनुष्य पाहून कराराची मला आठवण होईल मी पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याशी चिरंतन काळासाठी केलेल्या कराराची मला आठवण होईल.”
17 17 तेव्हा देव नोहाला म्हणाला, “ते रंगीत धनुष्य माझ्यामध्ये पृथ्वीवरील सर्वसजीव प्राण्यामध्ये झालेल्या कराराचा पुरावा आहे.”
18 18 नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम याफेथ अशी होती; (हाम हा कनानाचा बाप होता
19 19 हे नोहाचे तीन मुलगे होते; यांच्या पासूनच पृथ्वीवर लोकवस्ती झाली.
20 20 नोहा शेतकरी झाला त्याने एक द्राक्षमळा लावला;
21 21 त्याने द्राक्षारस तयार केला तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला आपल्या तंबूत उघडानागडा पडला.
22 22 तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपला बाप उघडानागडा पडलेला असल्याचे पाहिले त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले;
23 23 मग शेम याफेथ यांनी एक झगा घेतला तो आपल्या पाठीवर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाहीं.
24 24 नंतर नोहा जागा झाला, (तो द्राक्षारसाच्या नशेमुळे झोपला होता) तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्याला समजले.
25 25 तेव्हा नोहा म्हणाला,“कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.”
26 26 नोहा आणखी म्हणाला, “शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो! कनान शेमचा गुलाम होवो.
27 27 देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.”
28 28 जलप्रलया नंतर नोहा साडेतीनशे वर्षे जगला;
29 29 नोहा एकूण साडे नऊशे वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×