Bible Versions
Bible Books

Isaiah 58 (MRV) Marathi Old BSI Version

1 तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा. थांबू नका. रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा. लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा. याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
2 2 म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील. माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल. योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल. देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत. त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील. न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.
3 3 आता ते लोक म्हणतात, “तुझ्याबद्दल आदर दाखविण्यासाठी आम्ही उपास करतो. तू आमच्याकडे का पाहत नाहीस? तुझा राखण्यासाठी आम्ही आमच्या शरीरांना क्लेश करून घेतो. तू आमची दखल का घेत नाहीस?”पण परमेश्वर म्हणतो, “विशेष दिवशी उपास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे ते करता. तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता.
4 4 तुम्ही भुकेले आहात. पण ती भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही तर भांडणाची आणि लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही भुकेले आहात. तुम्ही माझ्याकरिता उपास करीत नाही. माझी स्तुती करण्याची तुमची इच्छा नाही.
5 5 त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का?
6 6 “मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी.
7 7 भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”
8 8 तुम्ही ह्या केल्यात तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या जखमा भरून येतील. तुमचा “चांगुलपणा” (देव) तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल.
9 9 नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”लोकांना त्रास देण्याचे त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये.
10 10 भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.
11 11 परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.
12 12 पुष्कळ वर्षे तुमच्या शहरांचा नाश झाला. पण नवीन शहरे वसविली जातील आणि त्या शहरांचा पाया अनेक वर्षे टिकून राहील. तुम्हाला “कुंपण पक्के करणारा आणि रस्ते घरे बांधणारा” असे नांव मिळेल.
13 13 तुम्ही देवाच्या शब्बाथच्या नियमाविरूध्द वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वत:च्या खुषीकरिता काही करण्याचे टाळाल तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाथला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे वा बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा.
14 14 मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. परमेश्वरानेच हे सर्व सांगितले असल्यामुळे हे सर्व घडून येईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×