Bible Versions
Bible Books

2 Corinthians 4 (MRV) Marathi Old BSI Version

1 म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे, आम्ही धीर सोडत नाही.
2 2 तर आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी सोडून दिल्या आहेत, आम्ही कपटाने वागत नाही. आणि कपटदृष्टीने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही, तर देवासमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुध्दिला पटवितो.
3 3 आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे, जे नाश पावत आहेत अशांसाठी ते आच्छादित आहे.
4 4 या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत. यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊन नये. जो देवाच्या प्रतिमेचा आहे.
5 5 कारण आम्ही आमचीच सुवार्ता सांगत नाही तर ख्रिस्त येशू हाच प्रभु आहे अशी घोषणा करतो आणि आम्ही येशू ख्रिस्तासाठी तुमचे सेवक आहोत असे स्वत:विषयी सांगतो.
6 6 कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंत:करणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा.
7 7 पण आमचा हा ठेवा मातीच्या भांड्यामध्ये आहे. यासाठी की, सामर्थ्याची पराकोटी देवापासून येते, आम्हांकडून नाही.
8 8 आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही.
9 9 छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही.
10 10 आम्ही नेहमी येशूचे मरण आमच्या शरीरात घेऊन जात असतो. यासाठी की ख्रिस्ताचे जीवनही आमच्या शरीराद्वारे प्रकट व्हावे.
11 11 कारण आम्ही जे जिवंत आहोत ते आम्ही नेहमीच ख्रिस्ताकरिता मरणाला सोपविलेले आहोत. यासाठी त्याचे जीवन आमच्या मर्त्य शरीराद्वारे प्रकट व्हावे.
12 12 म्हणून मग, आमच्यामध्ये मृत्यू काम करीत आहे, पण तुमच्यामध्ये जीवन काम करीत आहे.
13 13 असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला; म्हणून मी बोललो आहे.” विश्वासच्या त्याच आत्म्याने आम्हीसुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो.
14 14 कारण आम्हांला माहीत आहे ज्याने प्रभु येशूला उठविले, तो त्याच्याबरोबर आम्हांला उठवील आम्हांला तुमच्याबरोबरच त्याच्यासमोर सादर करील.
15 15 कारण या सर्व गोष्टी तुम्हाकरिता आहेत. यासाठी की, पुष्कळांच्या द्धारे विपुल झालेली कृपा अनेकांच्या उपकारस्तुतीमुळे देवाचे भरघोस गौरव होण्याला कारण व्हावी.
16 16 म्हणून आम्ही धीर सोडीत नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत.
17 17 कारण आमची हलकी क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे.
18 18 म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×