Bible Versions
Bible Books

Psalms 144 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.
2 2 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर वश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.
3 3 परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात? आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो?
4 4 माणसाचे आयुष्य म्हणजे हवेचा झोत, माणसाचे आयुष्य म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली.
5 5 परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये, पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल.
6 6 परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव, तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
7 7 परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव. मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस. मला त्या परक्यांपासून वाचव.
8 8 हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.
9 9 परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन. मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन.
10 10 परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो. परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले.
11 11 मला या परक्यांपासून वाचव. हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.
12 12 आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत. आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
13 13 आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत. आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत.
14 14 आमचे सैनिक सुरक्षित आहेत. कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रचत्न करीत नाही. आम्ही लढाईवर जात नाही. आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.
15 15 अशा वेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×