Bible Versions
Bible Books

Psalms 127 (MRV) Marathi Old BSI Version

1 जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
6 6 त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणीत्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×