Bible Versions
Bible Books

Psalms 150 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 6 स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×