Bible Versions
Bible Books

1 Chronicles 26 (MRV) Marathi Old BSI Version

1 द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या घराण्यातील होते. त्यांची नावे अशी: मेशेलेम्या आणि त्याची मुलेबाळे. (आसाफच्या कुळातील कोरहचा हा मुलगा.)
2 2 मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
3 3 अलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
4 4 आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
5 5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमवर खरोखच कृपादृष्टी होती.
6 6 शमाया हा ओबेद-अदोमचा मोठा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे चांगले कणखर योध्दे असल्यामुळे त्यांची आपल्या पितृकुळावर सत्ता होती.
7 7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशाल होते.
8 8 हे सर्व ओबेद-अदोमचे वंशज त्याची मुले, नातेवाईक असे सर्वच पुरुष पराक्रमी होते. ते सावध पहारेकरी होते. ओबेद - अदोमचे एकंदर 62वंशज होते.
9 9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
10 10 मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता.
11 11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
12 12 द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
13 13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
14 14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
15 15 ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले.
16 16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली.पहारेकरी एकमेकांलगत उभे असत.
17 17 पूर्व दरवाजावर सहा लेवी, उत्तर दरवाजावर चार लेवी, दक्षिण दरवाजावर चार जण, भांडाराच्या रक्षणासाठी दोन लेवी दिवसभर सतत पहारा देत.
18 18 पश्मिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत. आणि त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन रक्षक असत.
19 19 कोरह आणि मरारी यांच्या घराण्यातील द्वाररक्षकांच्या गटांची यादी पुढीलप्रमाणे:
20 20 अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवात चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.
21 21 लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक.
22 22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे. परमेश्वराच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
23 23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
24 24 अबुएल हा परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावरचा नायक म्हणून नेमला गेला. अबुएल गेर्षोनचा मुलगा. गेर्षोम मोशेचा मुलगा.
25 25 अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडून: रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ.
26 26 दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.
27 27 यापैकी काही युध्दात मिळालेली लूट होती. ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी देऊन टाकली.
28 28 शमुवेल हा द्रष्टा, कीशचा मुलगा शौल आणि नेरचा मुलगा अबनेर, सरुवेचा मुलगा यवाब यांनी परमेश्वराला दिलेल्या पवित्र वस्तूंची देखभालही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
29 29 कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत.
30 30 हशब्या हा हेब्रोन घराण्यातला. यार्देन नदीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या इस्राएलच्या भूमीवरील परमेश्वराचे कार्य आणि राज्याचा कारभार हशब्या आणि त्याचे भाऊबंद पाहात असत. या गटात 1,700 शूर वीर होते.
31 31 हेब्रोन घराण्याच्या इतिहासावरुन असे दिसते की यरीया हा त्यांचा प्रमुख होता. चाळीस वर्षे राज्य केल्यावर दावीदाने जेव्हा शूर आणि कसबी पुरुषांचा शोध घेतला तेव्हा गिलाद मधल्या याजेर नगरात त्याला हेब्रोन घराण्यांत अशी माणसे आढळली.
32 32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे असे 2,700 नातलग यरीयाला होते. परमेश्वराचे कार्य आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धावंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2,700 जण दावीदाने नेमले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×