Bible Versions
Bible Books

Esther 5 (MRV) Marathi Old BSI Version

1 तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. ती उभी होती तो राजमंदिरासमोरचा भाग होता. राजमंदिरात राजा सिंहासनावर बसला होता आणि त्याचे तोंड लोक येत त्या दिशेलाच होते.
2 2 त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तिला पाहून तो खुष झाला. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा राणी आत शिरली आणि राजाजवळ गेली. सुवर्णराजदंडाच्या दुसऱ्या टोकाला तिने स्पर्श केला.
3 3 मग राजाने तिला विचारले, “राणी एस्तेर तुला कसली काळजी लागली आहे? तुला काय विचारायचे आहे? तुला तू मागशील ते मी देईन, अगदी अर्धे राज्यदेखील देईन.”
4 4 एस्तेर म्हणाली, “तुमच्यासाठी आणि हामानसाठी मी भोजन तयार केले आहे. तुम्ही आणि हामान या भोजनाला आज यावे”
5 5 तेव्हा राजा म्हणाला, “हामानला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हाला एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.”राजा आणि हामान मग एस्तेरने आखलेल्या भोजन समारंभाला गेले.
6 6 ते द्राक्षारस घेत असताना पुन्हा राजाने एस्तरेला विचारले, “आता सांग एस्तेर तुला काय हवे आहे? हवे ते माग. मी ते तुला देईन. बोल तर काय पाहिजे? तुला काय हवे ते देईन, अगदी अर्धे राज्यसुध्दा देईन.”
7 7 एस्तेर म्हणाली, “मला मागायचे ते असे:
8 8 राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”
9 9 हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन:स्थितीत राजमहालातून निघाला. पण मर्दखयला राजद्वाराशी पाहाताच त्याला मर्दखयचा आतिशय संताप आला. हामान तिथून निघाला तेव्हा मर्दखयने त्याला मान दिल्यामुळे हामान रागाने वेडापिसा झाला. मर्दखय हामानला घाबरत नव्हता आणि त्याचाच हामानला राग आला.
10 10 पण आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि बायको जेरेश यांना त्याने बोलावले.
11 11 आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला त्याने सुरुवात केली. आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वाच्च अधिकाराचे स्थान या सगव्व्यांची तो बढाई मारु लागला.
12 12 हामान पुढे म्हणाला, “एवढच नाहीतर राणी एस्तेरने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर फक्त मलाच काय ते तिने बोलावले. पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
13 13 पण या सगव्व्या गोष्टींचा मला तेवढा आनंद होत नाही. तो यहुदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला आहे तोपर्यंत मला खराखुरा आनंद मिळणार नाही”
14 14 मग हामानची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र यांनी एक सूचना मांडली ते म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक स्तंभ उभारायला सांग तो75फूट उंच असू दे. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.”हामानला ती सूचना आवडली म्हणून त्याने फाशीचा स्तंभ उभारायची आज्ञा केली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×