Bible Versions
Bible Books

Matthew 4 (MRV) Marathi Old BSI Version

1 मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले.
2 2 चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली.
3 3 तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”
4 4 येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.”‘ अनुवाद 8:3
5 5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (यरुशलेेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले.
6 6 आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की,‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील.”‘ स्तोत्र 91:11-12
7 7 येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.”‘ अनुवाद 6:16
8 8 मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले.
9 9 सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”‘
10 10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”‘ अनुवाद 6:13
11 11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.
12 12 नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.
13 13 परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे.
14 14 यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते:
15 15 जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश यहूदीतरांचा गालील यांमधील-
16 16 अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” यशया 9:1-2
17 17 त्योवेळेपासून येशू उपदेश करू लागला म्हणू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”(मार्क 1:16-20; लूक 5:1-11)
18 18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
19 19 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
20 20 मग ते मागेपुढे पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले.
21 21 तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले.
22 22 तेव्हा ते आपली नाव आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले.
23 23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग दुखणी बरी केली.
24 24 येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.
25 25 मग गालील दकापलीस, यरुशलेम यहूदीया येथून यार्देनेच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×