Bible Versions
Bible Books

Judges 15 (MRV) Marathi Old BSI Version

1 गव्हाच्या कापणीच्या हंगामात शमशोन आपल्या बायकोच्या भेटीला निघाला. एक करडूही त्याने भेटीदाखल घेतले. माझ्या पत्नीच्या दालनात मी जातो असे तो म्हणाला.पण तिच्या वडीलांनी त्याला आत जायला मज्जाव केला.
2 2 ते त्याला म्हणाले, “तुला तर ती नकोशी झाली आहे असे मला वाटले. म्हणून तुमच्या विवाहतील सोबत्याशी मी तिचे लग्न लावून दिले. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा देखणी आहे. तेव्हा तू तिच्याशी लग्न कर.”
3 3 पण शमशोन म्हणाला, “आता पलिष्ट्यांचे नुकसान करायला मला चांगले निमित्त मिळाले आहे. मला आता त्याबद्दल कोणी दोष देणार नाही.”
4 4 मग बोहेर पडून त्याने तीनशे कोल्हे धरले दोन दोन कोल्ह्यांच्या शेपट्या एकत्र बांधून तिथे एक एक मशाल बांधली.
5 5 त्याने त्या मशाली पेटवून दिल्या आणि सर्व कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या धान्याच्या उभ्या पिकात धावायला सोडले. त्यामुळे शेतातील कापणी झालेले. झालेले असे सर्व पीक भस्मसात झाले. एवढेच नव्हे तर द्राक्षाचे आणि जैतुनाचे मळेही बेचिराख झाले.
6 6 “कोणी केले हे सगळे?” पलिष्टी विचारु लागले. कोणी तरी म्हणाले. “तिम्न येथील एकाचा जावई शमशोन हा या सगव्व्याच्या पाठीमागे आहे. कारण त्याच्या सासऱ्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहातील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ट्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले.
7 7 तेव्हा शमशोन पलिष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. आता मी ही तुमच्याशी वाईट वागेन त्यानंतरच मी थांबेन.”
8 8 शमशोनने मग पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक जण ठार झाले. त्यानंतर शमशोन एटाम खडकांमधील गुहेत राहिला.
9 9 इकडे पलिष्टी लोक यहूदात गेले आणि लेही या ठिकाणी त्यांनी तळ दिला. तेथून त्यांनी युध्दाची तयारी सुरु केली.
10 10 तेव्हा यहूद्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलात काय?”ते म्हणाले, “आम्ही शमशोनला ताब्यात घ्यायला आलो आहोत. त्याला आम्हाला कैद करायचे आहे. त्याने आमच्या लोकांशी केलेल्या वर्तणुकीची सजा त्याला द्यायची आहे.”
11 11 हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ट्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?”शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्यांना मी शिक्षा दिली आहे.”
12 12 त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुसक्या बांधून तुला पलिष्ट्यांच्या स्वाधीन करायला आलो आहोत.”शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वत: मला इजा करणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या.”
13 13 यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्कालावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन दोरखंडांनी बांधून गुहेतून वर आणले.
14 14 शमशोन लेही या ठिकाणी आला तेव्हा पलिष्टी लोक त्याला सामोरे आले. ते आनंदाने आरोव्व्या मारत होते त्याच वेळी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा प्रचंड सामर्थ्यानिशी संचार झाला. तेव्हा शमशोनचे दोरखंड जसे काही वाखाच्या जळलेल्या दोरीप्रमाणे कुचकामी झाले आणि त्यामुळे ते त्याच्या दंडांवरून आपोआप गळून पडले.
15 15 तेव्हा शमशोनला तिथे एका मृत गाढवाचे जबड्याचे हाड सापडले. त्याच्या साहाय्याने त्याने एक हजार पलिष्टी लोकांना ठार केले.
16 16 तेव्हा शमशोन म्हणाला.गाढवाच्या जबड्याच्या हाडाने मारली मी माणसे हजार! गाढवाच्या जबड्याच्या हाडाने रचली मी त्यांची उंच रास.
17 17 बोलणे संपल्यावर शमशोनने ते हाड तेथेच खाली टाकले. म्हणून त्या जागेचे नाव पडले, “रामथ-लेही’ म्हणजेच जबड्याच्या हाडाची टेकडी.
18 18 शमशोन तहानेने व्याकुळ झाला. तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. तो म्हणाला, “तुझा मी दास आहे. हा एवढा मोठा विजय तू मला मिळवून दिलास तेव्हा आता मला तहानेने तू खचितच मरु देणार नाहीस? ज्यांची सुंताही झालेली नाही अशा लोकांच्या तावडीत मी सापडू नये.”
19 19 तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन-हक्कोरे म्हणजे “धावा करणाऱ्याचा झरा” असे ठेवले. लेही शहरात हा झरा अजूनही आहे.
20 20 पलिष्ट्यांच्या अमदानीत शमशोन वीस वर्षे इस्राएलचा न्यायाधीश होता.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×