Bible Versions
Bible Books

Numbers 19 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
2 2 “परमेश्वराने इस्राएल लोकांना जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. काहीही दोष नसलेली एक लाल गाय घ्या. त्या गायीला कसलीही इजा झालेली नसावी आणि त्या गायीने मानेवर कधीही जू घेतलेले नसावे.
3 3 ती गाय याजक एलाजारला द्या. एलाजार ती गाय छावणी बाहेर नेईल आणि तिथे तिला मारील.
4 4 नंतर एलाजार, हा याजक थोडे रकत आपल्या बोटावर घेईल आणि काही रकत दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
5 5 नंतर संपूर्ण गाय त्याच्या समोर जाळली पाहिजे. कातडी, मास रकत आणि आतडे सर्वकाही जळले पाहिजे.
6 6 नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी गाय जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
7 7 याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
8 8 ज्या माणसाने गायीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
9 9 “नंतर जो माणूस शुद्ध असेल तो गायीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवील. शुद्ध होण्याचा जेव्हा लोक खास विधी करतात त्यावेळी त्यांना या राखेचा उपयोग करता येईल. एखाद्याचे पाप नाहीसे करण्यासाठी सुध्दा या राखेचा उपयोग करण्यात येईल.
10 10 “ज्या माणसाने गायीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील.”हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्या बरोबर जे परदेशी लोक रहात आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
11 11 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
12 12 त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी नंतर सातव्या दिवशी खास पाण्याने धुवावे. जर त्याने असे केले नाही तर तो अशुद्धच राहील.
13 13 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर माणूस अशुद्ध असताना पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या माणसाला इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध माणसावर खास पाणी शिंपडले नाही तर तो अशुद्ध राहील.
14 14 “जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा माणूस त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगव्व्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
15 15 आणि झाकण नसलेले प्रत्येक भांडे अशुद्ध होईल.
16 16 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो माणूस युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मेलेल्या माणसाच्या अस्थींना हात लावला तरी तो माणूस सात दिवस अशुद्ध होईल.
17 17 “त्या माणसाला पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या गायीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणीटाका.
18 18 शुद्ध माणसाने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या माणसांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मेलेल्या माणसाच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
19 19 “नंतर शुद्ध माणसाने हे पाणी तिसऱ्या सातव्या दिवशी अशुद्ध माणसाच्या अंगावर शिंपडावे. तो माणूस सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
20 20 “एखादा माणूस अशुद्ध झाल्यांनंतर पुन्हा शुद्ध झाला नाही तर त्याला इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. त्या माणसावर ते खास पाणी शिंपडले नाही आणि तो शुद्ध झाला नाही तर तो पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
21 21 तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या माणसावर पाणी शिंपडणे त्या माणसाने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कुठल्याही माणसाने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
22 22 जर त्या अशुद्ध माणसाने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो माणूस सुद्धा अशुद्ध होईल. तो माणूस संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×