Bible Versions
Bible Books

Ezekiel 48 (MRV) Marathi Old BSI Version

1 “उत्तर-सीमा पूर्वेकडील भूमध्य समुद्रापासून पुढे हेथलोन, हामाथची खिंड ओलांडून पार पुढे दिमिष्क हामाथ यांच्या सीमेवरील हसर-एनोनपर्यंत जाते. काही वंशांना दिलेला जमिनीचा पट्टा ह्या सीमेच्या पूर्वेकडून पश्र्चिमेकडे पसरलेला असेल. ज्यांना ही जमीन दिली जाईल ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढीलप्रमाणे आहेत. दान, आशेर, नफताली, मनश्शे, एफ्राईम, रऊबेन, यहूदा.
2 2
3 3
4 4
5 5
6 6
7 7
8 8 “ह्या जमिनीचा पुढचा भाग विशेष वापरासाठी आहे. हा भाग यहूदाला मिळालेल्या जमिनीच्या दक्षिणेला आहे. हा प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे 25,000 हात (8.3मैल) लांबीचा आहे. पूर्वेकडून पश्र्चिमेकडे त्याची रुंदी इतर वंशांना मिळालेल्या जमिनीच्या रुंदी एवढीच असेल ह्या जमिनीच्या मध्यावर मंदिर असेल.
9 9 तुम्ही जमीन परमेश्वराला अर्पण करावी. ती लांबीला 25,000 हात (8.3मैल) रुंदीला 20,000 हात (6.6मैल) असेल.
10 10 ही विशेष जमीन याजकांना आणि लेवी यांच्यात विभागली जाईल.“याजकांना ह्या जमिनीचा एक भाग मिळेल. ही जमीन उत्तरेला 25,000 हात लांबीची, पूर्वेला पश्र्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी 25,000 हात असेल. ह्या जमिनीच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
11 11 ही जमीन सादोकच्या वशांजासाठी असेल. माझे पवित्र याजक म्हणून ह्या लोकांची निवड केली गेली होती का? कारण इस्राएलच्या लोकांनी जेव्हा माझा त्याग केला, तेव्हा त्यांनी माझी सेवा केली. लेवीच्या इतर वंशांप्रमाणे सादोकच्या लोकांनी मला सोडून दिले नाही.
12 12 ह्या पवित्र जमिनीच्या भागातील हा खास हिस्सा विशेषत: ह्या याजकांसाठीच असेल. हा भाग लेवींच्या भागाच्या पलीकडेच असेल.
13 13 “याजकांना मिळालेल्या जमिनीच्या भागाचा पुढचा भाग लेवींचा हिश्शाचा असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा असेल. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे 25,000 हात (8.3 मैल) लांबीची 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची जमीन मिळेल.
14 14 लेवी ह्या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु शकणार नाहीत. त्यांनी देशाचा भाग वेगळा तोडता कामा नये. का? कारण ही जमीन परमेश्वराची आहे. ती विशेष आहे तो जमिनीचा सर्वांत उत्कृष्ट भाग आहे.
15 15 “याजक लेवी यांना दिलेली जमीन सोडून, 5,000 हात (1.6 मैल) रुंदीची 25,000 हात (8.3 मैल) लांबीची जमीन शिल्लक राहील. ती नगरासाठी, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. सामान्य लोकांनी या जागेचा वापर करावा. नगर ह्या जमिनीच्या मध्यावर वसेल.
16 16 नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील उत्तर बाजू 4,500 हात दक्षिण बाजू 4,500 हात पूर्व पश्र्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे 4,500 हात असतील.
17 17 नगरासाठी कुरण असेल. त्यांची चारी बाजूंची लांबी सारखी म्हणजे 250 हात (437फूट 6 इंच) असेल.
18 18 पवित्र भागाच्या पूर्वेला पश्र्चिमेला जी जमीन उरेल, तिची लांबी 10,000 हात (3.3 मैल) असेल. ही जमीन पवित्र भागाच्या बाजूला लागून असेल. ह्या जमिनीत नगराच्या कामगारांसाठी धान्य पिकविले जाईल.
19 19 नगरातील कामकरी जमिनीची मशागत करतील. हे लोक इस्राएली वंशांपैकी असतील.
20 20 “हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांब 25,000 हात (8.3 मैल) रुंद असेल. खास उद्देशासाठी तुम्ही हा भाग वेगळा ठेवावा. ह्यातील एक हिस्सा याजकसाठी, एक लेवींसाठी एक नगरासाठी असेल.
21 21 “जमिनीच्या विशेष भागाचा एक हिस्सा राजाचा असेल. हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा 25,000 हात (8.3 मैल) रुंदीचा असेल. ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा काही मंदिराकरिता आहे. मंदिर ह्या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
22 22
23 23 “ह्या विशेष जमिनीच्या दक्षिणेकडची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या वंशांना मिळेल. पूर्व-सीमेपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेल्या ह्या जमिनीचा हिस्सा ज्या वंशांना मिळेल, ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे असे: बन्यामीन, शिमोन, इस्साखार, जबुलून, गाद.
24 24
25 25
26 26
27 27
28 28 गादच्या जमीनीची दक्षिण सीमा तामारपासून मरीबोथ-कादेशाच्या हिरवळीच्या प्रदेशापर्यंत आणि तेथून पुढे मिसराच्या ओढ्याच्या बाजूने थेट भूमध्य समुद्रापर्यंत जाते.
29 29 हीच जमीन इस्राएलच्या वंशात विभागली जाईल. प्रत्येक वंशाला येथेच जमिनीचा भाग मिळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
30 30 “नगरीची प्रवेशद्वारे पुढीलप्रमाणे त्यांना, इस्राएलच्या वंशांवरुन नावे देण्यात येतील.“नगरीची उत्तर बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांबीची असेल.
31 31 “तिला तीन द्वारे असतील. रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार लेवीचे द्वार.
32 32 “नगरीची पूर्व बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार दानाचे द्वार.
33 33 “नगरीची दक्षिण बाजूसुद्धा 4,500 हात (1.2 मैल) लांबीची असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
34 34 “नगरीची पश्र्चिम बाजूही 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार नफतालीचे द्वार.
35 35 “नगरीभोवतीचे अंतर 18,000 हात (6 मैल) असेल. या क्षणापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे”असे पडेल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×