Bible Versions
Bible Books

Ezekiel 8 (MRV) Marathi Old BSI Version

1 एके दिवशी मी (यहेज्केल) माझ्या घरात बसलो होतो यहुदातील वडीलधारी लोक (नेते) माझ्यासमोर बसले होते. परागंदा काळातील सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या (सप्टेंबरच्या) पाचव्या दिवसाची ही गोष्ट आहे. एकदम माझ्यावर परमेश्वराचे, सामर्थ्य आले.
2 2 ज्वालेप्रमाणे काहीतरी मला दिसले. ते मनुष्याकृतीप्रमाणे दिसत होते. कमेरखाली अग्नीप्रमाणे दिसत होते. कमरेवरचा भाग तप्त धातूप्रमाणे तेजस्वी चमकदार होता. मग मला हातासारखे काहीतरी दिसले. तो हात पुढे आला आणि त्याने माझे केस पकडले. मग वाऱ्याने मला वर उचलले देवाच्या दृष्टान्यातच त्या हाताने मला यरुशलेमला नेले. त्याने मला उत्तरेकडच्या आतील दाराजवळ नेले. देवाला ज्याचा मत्सर वाटत होता, तो पुतळा तेथेच होता.
3 3
4 4 पण इस्रएलच्या देवाची प्रभाही तेथे होती. खबार कालव्याजवळ मला झालेल्या दृष्टान्तातील प्रभेप्रमाणेच ही प्रभा होती.
5 5 देव माझ्याशी बोलला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा” म्हणून मी उत्तरेकडे पाहिले तो काय, उत्तरेकडच्या वेदी - प्रवेशद्वाराजवळ देवाच्या मत्सराला कारणीभूत झालेला तो पुतळा उभा होता.
6 6 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक किती भयानक गोष्टी करीत आहेत, हे तू पाहतोस ना? त्यांनी ही गोष्ट अगदी माझ्या मंदिरालगत उभी केली. आणि जर तू माझ्याबरोबर आलास, तर तुला आणखी भयानक गोष्टी दिसतील.”
7 7 मग मी मंदिराच्या चौकाच्या प्रवेशद्वाराकडे गेलो. तेथे भिंतीत मला एक छिद्र दिसले.
8 8 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, त्या भिंतीला छिद्र पाड.” मी तसेच केले. तेथे मला एक दार दिसले.
9 9 मग देव मला म्हणाला, “लोक येथे भयंकर पाप करीत आहेत ते जाऊन पाहा.”
10 10 म्हणून मी आत जाऊन पाहिले ज्यांचा विचारही अमंगळ वाटावा अशा सर्व प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पशूंच्या मूर्ती तेथे होत्या. त्याच घाणेरड्या मूर्तींची इस्राएलचे लोक पूजा करीत होते. प्रत्येक भिंतीवर त्या प्राण्यांची चित्रे कोरलेली होती.
11 11 नंतर माझ्या लक्षात आले की तेथे शाफानचा मुलगा याजन्या सत्तर वडीलधारी नेते इतर लोकांबरोबर पूजा करीत होते. ते लोकांच्या अगदी पुढेच होते. प्रत्येक नेत्याच्या हातात धूपदान होते. धूपाचा सुवास आसमंतात दरवळला होता.
12 12 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलधारे अंधारात काय करीत आहेत. हे तुला दिसतेच ना? प्रत्येक माणसाला त्याच्या खोट्या देवासाठी वेगळी खोली आहे. ते लोक मनाशी म्हणतात ‘परमेश्वर आम्हाला पाहू शकत नाही. परमेश्वराने ह्या देशाचा त्याग केला.”‘
13 13 नंतर देव म्हणाला, “जर तू माझ्याबरोबर आलास, तर हे लोक आणखी भयंकर कृत्ये करीत असल्याचे तुला दिसेल.”
14 14 मग देवाने मला परमेश्वराच्या मंदिराच्या प्रेवेशद्वाराकडे नेले. हे द्वार उत्तरेला होते. तेथे स्त्रिया बसून रडत होत्या. त्या खोटा देव तम्मुज याच्यासाठी शोक करीत होत्या.
15 15 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या भयंकर गोष्टी बघतो आहेस ना? माझ्याबरोबर ये म्हणजे तुला ह्यापेक्षा वाईट गोष्टी दिसतील.”
16 16 मग त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातील आतल्या अंगणात नेले. तेथे पंचवीसजण नतमस्तक होऊन पूजा करीत होते. ते द्वारमंडप वेदी यांच्यामध्ये होते. पण त्यांची तोंडे चुकीच्या दिशेला होती. पवित्रस्थळाकडे त्यांच्या पाठी होत्या. ते नतमस्तक होऊन सूर्याची पूजा करीत होते.
17 17 मग देव म्हणाला, “मानवपुत्रा, हे पाहतो आहेस ना? यहुदाच्या लोकांना माझे मंदिर अशी भयंकर कृत्ये करण्याएवढे क्षुद्र वाटते. हा देश हिंसेने भरला आहे. ते मला संतापविणारी कृत्ये सतत करीत आहेत. पाहा! खोट्या देवाप्रमाणेच चंद्राला मान देण्यासाठी नाकांत नथनी घालीत आहेत.
18 18 मी माझा राग त्यांच्यापाशी प्रकट करीन. मी त्यांना अजिबात दया दाखविणार नाही. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटणार नाही. ते मला हाका मारतील पण मी त्यांचे मुळीच ऐकणार नाही.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×