Bible Versions
Bible Books

Numbers 4 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर मोशे अहरोन यांना म्हणाला,
2 2 “लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या लोकांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)
3 3 सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची दर्शनमंडपात सेवा करण्यासाठी गणती कर.
4 4 दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूची त्यांनी काळजी घ्यावी.
5 5 “इस्राएल लोक आपला तळ नवीन जागी हलवितील तेव्हा अहरोन त्याच्या मुलांनी दर्शनमंडपात जाऊन अंतरपट खाली काढावा त्याने पवित्र कराराचा कोश झाकावा.
6 6 मग त्यांनी ह्या सर्वावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे मग कराराच्या कोशाला दांडे लावावे.
7 7 “मग त्यांनी पवित्र मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे पवित्र भाकरही त्यावर ठेवावी.
8 8 मग त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे नंतर ते सर्व तहशाच्या उत्तम कातड्याने झाकून टाकावे; त्यानंतर मेजाला दांडे बसवावे.
9 9 मग त्यांनी दीपवृक्ष आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.
10 10 मग ह्या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या उत्तम कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या खांबांवर त्यांनी ठेवावे.
11 11 “त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या उत्तम कातड्याने झाकावे मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.
12 12 “मग पवित्र स्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.
13 13 “मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी तिच्यावर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.
14 14 नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी कटोरे हे वेदीचे सर्व सामान गोळा करुन ते वेदीवर ठेवावे; मग तिच्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन घालावे मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.
15 15 “अहरोन त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत.
16 16 “पवित्र निवासमंडप त्यातील सर्व सामान उपकरणे म्हणजे पवित्रस्थान त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे अभिषेकाचे तेल ह्या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.”
17 17 परमेश्वर मोशे अहरोन ह्यांना म्हणाला,
18 18 “सावध राहा! कहाथी लोकांचा नाश होऊदेऊ नका;
19 19 तुम्ही ही कामे करावीत म्हणजे मग कहाथी लोक परम पवित्र स्थानाजवळ जातील तेव्हा ते मरणार नाहीत; अहरोन त्याचे मुलगे ह्यांनी परमपवित्रस्थानात जाऊन कहाथी लोकांतील एकेका माणसाला त्याने कोणकोणत्यावस्तू वाहून न्याव्यात ते सांगावे ते दाखवावे.
20 20 जर तुम्ही असे करणार नाही तर मग कहाथी लोक कदाचित आत जातील पवित्र वस्तू त्यांच्या नजरेस पडतील आणि त्यांनी तसे क्षणभर जरी पाहिले तरी ते मरतील.”
21 21 परमेश्वर मोशेला म्हणाला,
22 22 “गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्याप्रमाणे त्यांची यादी कर;
23 23 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाच्या ज्या लोकांनी सैन्यात सेवा केली आहे अशा लोकांची गणती कर; दर्शनमंडपाची देखभाल करण्याचे काम त्यांच्याकडे राहील.
24 24 “गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा वाहावयाची ओझी ही अशी:
25 25 त्यांनी पवित्र निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप त्याचे आच्छादन आणि तलमशा उत्तम कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,
26 26 पवित्रनिवासमंडप वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराजा पडदा, सर्व तणावे त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, हे सर्व सामान गेर्षोनी कुळांनी वहावे; आणि ह्या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे;
27 27 अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी. त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी. तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी. ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे
28 28 गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्यावर त्यांच्या कामाची जबाबदारी राहील.”
29 29 “मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्या प्रमाणे गणती कर.
30 30 म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दलात सेवा केलेल्या पुरुषांची गणती कर. हे लोक दर्शनमंडपातील विशेष सेवा करतील.
31 31 तुम्ही जेव्हा पुढील प्रवासासाठी निघाल तेव्हा दर्शनमंडपाचा सांगाडा वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.
32 32 तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या माणसांच्या नावांवी यादी करा प्रत्येकाने नेमके काय वाहून न्यायचे ते त्याला सांगा.
33 33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.”
34 34 मोशे, अहरोन इस्राएल लोकांचे पुढारी ह्यांनी कहाथी लोकांची, त्यांची कुळे वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.
35 35 त्यांनी, सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली. दर्शनमंडपासाठी त्यांना खास काम दिले गेले होते.
36 36 हे काम करण्यास दोन हजार सातशे पन्नास कहाथी लोक पात्र ठरले.
37 37 तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र सेवा करण्याचे काम देण्यात आले. मोशे अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्या प्रमाणे हे केले.
38 38 तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली;
39 39 म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. त्यांना दर्शनमंडपासाठी करण्यासाठी विशेष काम दिले गेले होते.
40 40 तेव्हा दर्शनमंडपात काम करण्यास दोन हजार सहाशें तीस गेर्षोनी लोक पात्र ठरले.
41 41 तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र काम देण्यात आले. मोशे अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
42 42 त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,
43 43 म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली.
44 44 तेव्हा तीन हजार दोनशें मरारी लोक दर्शनमंडपात काम करण्यास पात्र ठरले.
45 45 तेव्हा त्यांना त्यांचे विशेष काम देण्यात आले. मोशे अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
46 46 तेव्हा मोशे, अहरोन इस्राएलाचे पुढारी ह्यांनी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.
47 47 तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले.
48 48 त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.
49 49 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची गणती करण्यात आली; प्रत्येक माणसाला त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×