Bible Versions
Bible Books

Revelation 12 (MRV) Marathi Old BSI Version

1 आणि मग एक अदभुत महान चिन्ह आकाशात दिसले. तेथे एक स्त्री होती. ती सूर्याचा पेहराव केलेली होती. चंद्र तिच्यापायाखाली होता. तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुगुट होता.
2 2 ती स्त्री गरोदर होती. ती (बाळाला) जन्म देणार असल्यानेवेदनांनी ओरडली.
3 3 मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले: तेथे फार मोठा तांबडा साप होता. त्या सापाला सात डोकीहोती त्या सातही डोक्यांवर एक एक मुगूट होता. त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती.
4 4 त्या सापाने आपल्या शेपटीच्याफटकाऱ्याने एक तृतीयांश तारे झटकून पृथ्वीवर खाली टाकून दिले. जी स्त्री बाळाला जन्म देणार होती त्या स्त्रीच्या समोर तोप्रचंड साप उभा राहिला. त्या सापाला त्या स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला खायचे होते.
5 5 त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला.तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले.
6 6 तो स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली. तेथे त्या स्त्रीची एक हजार दोनशे साठ दिवसकाळजी घेण्यात येईल.
7 7 मग स्वर्गात एक युद्ध झाले. मीखाएलआणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप त्याचे दूत हे सुद्धात्यांच्याशी लढले.
8 8 पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावेलागले.
9 9 सापला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्णजगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
10 10 मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, “तारण, सामर्थ्य, आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्याख्रिस्ताचा अधिकार ही आली आहेत. कारण आमच्या भावांना दोष लावणारा जो अहोरात्र आमच्या देवासमोर त्यांनाशिव्याशाप देत होता, याला खाली फेकण्यात आले आहे. आमच्या देवासमोर तो आमच्या भावांवर दिवस आणि रात्र दोषारोपकरीत होता, त्याचा
11 11 आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते, त्या सत्याने पराभव केला.त्यांनी त्यांच्या जिवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही,
12 12 म्हणून आकाशांनो, जे तुम्ही तेथे राहता तेतुम्ही आनंदी असा. पण पृथ्वी समुद्राचे वाईट होईल. कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे. तो रागाने भरलेलाआहे. त्याला माहीत आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही.”
13 13 जेव्हा त्या प्रचंड सापाने पाहिले की त्याला पृथ्वीवर खाली फेकण्यात आले आहे तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिलाहोता, तिच्या मागे तो लागला.
14 14 मग सापासमोरुन तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणी उडून जाता यावे म्हणूनत्या स्त्रीला मोठ्या गरुडाचे पंख देण्यात आले होते. मग त्या ठिकाणी साडेतीन वर्षेपर्यंत तिचे पोषण केले जाते.
15 15 मग त्यासापाने आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. सापाने ते पाणी स्त्रीकडे ओतले यासाठी की तिने त्या पाण्यात वाहत जावे.
16 16 पण पृथ्वीने तिला मदत केली. पृथ्वीने तिचे तोंड उघडले त्या प्रचंड सापाच्या तोंडातून आलेली नदी तिने गिळूनटाकली.
17 17 मग तो साप त्या स्त्रीवर फार रागावला. मग तो साप त्या स्त्रीच्या इतर मुलांशी युद्ध करण्यास दूर निघून गेला.तिची मुले ही आहेत जी देवाच्या आज्ञेचे पालन करतात आणि येशूने शिकविलेले सत्य त्यांच्याकडे आहे.
18 18 तो प्रचंड साप समुद्रकिनाऱ्यावर उभा राहिला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×