Bible Versions
Bible Books

Psalms 75 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली, मी बरोबर न्याय करीन.
3 3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4 4 “काही लोक गर्विष्ठ असतात. ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते, परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका. एवढे गर्विष्ठ बनू नका.’
5 5
6 6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही.
7 7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे. तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन. मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×